Home महाराष्ट्र लांडगे परिवाराच्या वतीने सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन

लांडगे परिवाराच्या वतीने सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन

286

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1मे):-मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचा क्षण म्हणून असताना हरिश्चंद्र तानाजी लांडगे यांनी म.फुले यांच्या विचारधारेला प्रेरित होऊन आयु. राजू हरिश्चंद्र लांडगे व आयु. द्रोपदा तोलबा लोंढे यांच्यातील विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने 12-5-2022 रोजी पूजा मंगल कार्यालयात होईल असे निमंत्रण पत्रावरून कळविले आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती महिन्यातील औचित्य साधून सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात असताना या पूर्वीही रोहिदास लांडगे या मुलाचा ही सत्यशोधक पद्धतीने विवाह 2005 मध्ये आयोजित केला होता.

सत्यशोधक पद्धतीने विवाह असल्यामुळे आधुनिक निमंत्रण पत्रिकेवर छ.शिवाजी महाराज,संत रविदास,शाहू महाराज,सावित्रीबाई फुले,रमाई आंबेडकर,अहिल्याबाई होळकर,उस्ताद लहुजी साळवे,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,म.फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांच्या फोटो छापून म.फुले यांच्या विचारधारेला अभिवादन करत लांडगे परिवाराने इतरांना प्रेरणा दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here