Home महाराष्ट्र समता नायक महात्मा बसवेश्वर !

समता नायक महात्मा बसवेश्वर !

205

▪️महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने विशेष लेख

✒️लेखक:-किसन सूर्यवंशी, लातूर(मो:-9766250921)

महात्मा बसवेश्वर यांचा जन्म बाराव्या शतकामध्ये आजचे जे कर्नाटक राज्य आहे.या कर्नाटक राज्यामध्ये झाला .त्या काळामध्ये समाज जाती-पाती मध्ये अंधश्रद्धा मध्ये गुरफटून गेला होता .अंधविश्वास, रूढी, विषमता, कर्मकांड यांना तिलांजली देऊन बुद्धाचे विचार अंगीकारणारे महात्मा बसवेश्वर हे प्रथम क्रांतिकारक होते .
सामाजिक धार्मिक समतेच्या पुरस्कारासाठी त्यांनी शिवलिंगाचे प्रतीक उपयोगात आणले .दलित शोषित पीडितांना एक स्वतंत्र असा लिंगायत धर्म दिला .महात्मा बसवेश्वरांनी सर्व अठरा पगड जातींना एकतेच्या सूत्रांमध्ये बांधले .

*गृहत्याग-
आठ वर्षाचे बालबसव होते आणि त्या काळामध्ये असलेल्या धर्म, रूढी, परंपरा नुसार मुंज करणे ही एक प्रथा होती, मग महात्मा बसवेश्वर यांचे वडील यांनी बाल बसवाची मुंज करण्याचे ठरवले .
त्यावेळी बालबसव म्हणतात माझी मोठी बहीण अक्कानागाई आहे तिची अगोदर मुंज करा ,मगच माझी करा

या ठिकाणी महात्मा बसवन्ना यांनी अतिशय लहान वयामध्ये स्त्रियांना समान हक्क द्यावा स्त्रियांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी विद्रोह केलेला दिसून येईल.आपली बहीण असताना तिची मुंज होऊ न देणे,केवळ पुरुष म्हणून माझी मुंज करणे हा जो स्त्री-पुरुष भेदभाव आहे आणि ज्या धर्मग्रंथाने हा भेदभाव केला जातो , धर्मग्रंथ नाकारतात .शेवटी बाल बसवांना आपल्या बहिणीची मुंज करावी अन्यथा आम्ही ग्रहत्याग करतो असे म्हणून बालबसव हे घर सोडून कुडलसंगम ठिकाणी निघून जातात

* अनुभव मंटप-

महात्मा बसवन्ना हे बिजजळ राजाच्या दरबारामध्ये मंत्री म्हणून काम करत असतात .त्यावेळी त्यांनी आपल्या सेवेस प्रारंभ करतानाच सामाजिक क्रांतीची सुद्धा चळवळ या ठिकाणी जिवंत ठेवली .
धर्म जागृती करण्याचे कामामध्ये पूर्ण स्वातंत्र्य मिळावे ही अट महात्मा बसवन्ना यांनी राजा बिजळांना घातलेली होती , ती राजाने आनंदाने मान्य केली होती .मंगळवेढ्यात त्यांनी एक स्वप्न पाहिले होते त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी मात्र त्यांना कल्याणला यावे लागले ,महात्मा बसवेश्वरांनी आपल्या घराजवळ अनुभव मंडप उभारले.

अनुभव मंटप म्हणजे आजची लोकशाही संसद आहे ,जी विधानसभा आहे हे बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवन्ना निर्माण केलेले अनुभव मंटप आहे .अनेक प्रकारच्या शृंखलेत अडकलेल्या माणसाला त्यांच्या मुक्तीचा मार्ग मानव मुक्तीचा धडा या अनुभव मंटपातून मिळणार होता विषमता असताना अशा वेळी माणूस हा जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ बनतो हा विचार येथे शिकवला जात असे .देव, अंधश्रद्धा ,कर्मकांड, पूजा, उपवास ,शुभ ,अशुभ ,आत्मा-परमात्मा या विषारी काटयांनी घायाळ झालेल्या माणसाच्या जखमेवर अमृत मलम लावणे सोबतच त्यांच्या विचारांची मशागत करण्याचा हा एक स्वतंत्र असा धर्म होता .

अनुभव मंटपात कोणी कोणी प्रवेश केला ??सदाचाराने व समतेने ज्याचे जीवन जगण्याची इच्छा आहे अशा सार्‍यांना प्रवेश होता ,
अनुभव मंटपाच्या सभासदांची संख्या ही 770 होती त्यामध्ये 700 पुरुष होते 70 महिला होत्या.काश्मीरचा राजा महादेव भूपाळ आपला सोन्याचा सिंहासनाला लाथ मारून महात्मा बसवण्णा यांच्या विचाराला आकर्षित होऊन अनुभव मंटपामध्ये सहभागी झालेला होता .त्या काळामध्ये असलेला नेपाळ ,दक्षिण भारत, काश्मीर, गुजरात, या संपूर्ण देशांमधून अनुभव मंटपाकडे लोकांचा ओढा वाढलेला होता .मानवी जीवनातील शांती मूल्यावर आधारित धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटप या सांस्कृतिक मुक्ती पिठाची स्थापना केलेली होती .विचारांचे अनुभवांचे आदान-प्रदान चर्चा ,वाद, विवाद ,संवाद करण्यासाठी या अनुभव मंटपामध्ये प्रत्येक माणूस जमू लागला .

*जगातला पहिला आंतरजातीय विवाह –

एक दिवस अनुभव मंटपात हरळया व मधुवरस हे दोन शरण शेजारी बसले होते .हरळया हा चांभार होता तर मधुवरस हा सवर्ण होता .मधुवरसंनी आपली मुलगी चांभार असलेल्या हरळयाच्या मुलाला देण्याचे ठरवले आणि हा विवाह मोठ्या थाटामाटात महात्मा बसवेश्वर यांनी लावून दिला.मानवी मूल्याच्या उदात्त ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी जातिव्यवस्थेच्या विरोधामध्ये उचलेल महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये असलेली एक दमदार पाऊल ठरलं .

*वचनांचे क्रांतिकारी आंदोलन –

अनुभव मंडपामध्ये प्रत्येक माणसाने स्वतःच्या अनुभवातून वचन लिहले.जसे संत तुकाराम महाराजांनी अभंग लिहीले तसे प्रत्येक शरणांनी वचन लिहिले,त्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे एक जगप्रसिद्ध वचन आहे ते आपल्या वचनामध्ये असे म्हणतात की ,हा कोणाचा? हा कोणाचा? असे असे कधीच म्हणू नका, हा आमचा आहे ,हा आमचा आहे, हा आपलाच आहे , ऐसेची म्हणावे

कुडलसंगम देवा

जात पात धर्म यांमध्ये गरीब-श्रीमंत भेद न करता प्रत्येक माणसाला आपला माणूस आपण समजलं पाहिजे यासाठी या वचनातून आपल्याला विश्वबंधुत्वाची संदेश देतात .

तसेच त्या काळामध्ये सुद्धा देवळे, नवस बकरे कापणे, उपासतापास ,याचा खूप परंपरा होती

बसवणणा आपल्या वचनामध्ये असं सांगतात

धनिक बांधती देवालय ,
देवा गरीब मी काय करू?
देहच माझे देवालय ,
पायच माझे देवळाचे खांब ,
मस्तक माझे देवळाचे कळस ,स्थावर नावे पारा” !!

या वचना मधून बसवेश्वर असं म्हणतात की जे लोक श्रीमंत आहेत ते मंदिर बांधतात, देवालय बांधतात आणि मी गरीब आहे आणि माझं हे संपूर्ण शरीर जे आहे ते शरीरचे मंदिर आहे ?

,माझे पाय म्हणजे या देवळाचे खांब आहेत ,माझे डोके म्हणजे देवळाचा कळस आहे ,आणि माझी जीभ ही म्हणजे देवळामध्ये असलेली घंटा आहे ,

अशाप्रकारे बसवेश्वर भौतिक मंदिराला नाकारून ह्या शरीरालाच मंदिराचे एक रूप देतात .

इतका मानवी शरीराची ते पूजा करतात

पुढे एका वचनात असे म्हणतात

“पाषाणाचा नाग पाहता करा दुग्धाभिषेक म्हणती,
जितेभुजंगाशि बघा हाना मारा म्हणती ,
भुकेला जंगम घर येता
चल येथून म्हणती ,
न खाणाऱ्या दगड देवास मात्र नैवद्य देती “!

या वचनाच्या माध्यमातून असे सांगतात एखादा साप निघाला तर त्याला हाणामारा असे म्हणतात आणि जो दगडी सापाचा भुजंग आहे तो दगड आहे ,त्याला मात्र नैवेद्य दाखवतो
आपल्या घरी आलेला एखादा भुकेला जंगम असेल तर त्याला मात्र इथून निघून जा

असे म्हणतात अशा प्रकारे त्या ठिकाणी शोषित पीडित गरिबांना अन्न देणे त्याची तहान भागवूणे

हाच खरा धर्म आहे असे सांगतात

” दया हेच धर्माचे मूळ रूप,दये विना धर्म तो कोणता ?
दया असावी सकल प्राणी मात्रा “!

असे आपल्या एका वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर आपल्याला धर्माचा खरा अर्थ सांगत असतात

जातिव्यवस्थेच्या विरोधात बोलत असताना त्यांचे एक वचन असे आहे

“जातीला धरून सुतक शोधतात ,ज्योतिला धरून अंधार शोधतात, हा कसला मूर्खपणा आहे??
जातीचा गर्व कशाला?? भक्त शिवाच्या वचन सांगते व्यर्थ जाऊ नको मानवा

आज जात बघून आता आपण प्रत्येक माणसाचे व्यवहार करतो पण तू असे करणे म्हणजे असं म्हणतात की एखादी ज्योत आहे ,दिवा आहे, पणती आहे, त्या पणतीला धरून राहणे
व अंधार याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अंधार दिसणार नाही अशा प्रकारे आपण जातीला धरून जर माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला फक्त माणूस दिसेल जात-पात-धर्म दिसणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतात .

*महात्मा बसवेश्वर स्त्री स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते-

जगाच्या इतिहासात गुलामीच्या वेदनेने मेलेल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास अगणित महिला अत्याचाराच्या टाचेखाली चिरडली गेली ,त्यांना जे दुःख निर्माण झाले ते निसर्गनिर्मित नाहीतर ती मानवनिर्मित आहे ,अशा पुरुषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाखाली स्त्रियांचा इतिहास पाहिल्यास स्त्रिया गुलामीच्या अत्याचाराच्या वेदनेने ढसाढसा रडल्या चा इतिहास आहे .

पण महात्मा बसवन्ना यांनी त्यांचे अनुभव मंडपामध्ये तब्बल 70 महिला ह्या वचन कार होत्या .

एकाच वेळी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यरचना झाली आणि ती महिलांच्या हातांनी

जगामध्ये खूप मोठी रूढी परंपरा आणि क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे ही घटना आहे.

हुतात्मा हरणळयाची विरांगणा , कल्याणी चरित्र आहे.
आपल्या मांडीचे कातडे कापून जोडे तयार करण्याची सूचना आपल्या पतीला देण्याचे धाडस महात्मा बसवन्ना मुळे आलेला आहे .

हे लक्षात घेणे गरजेचे आहे ती बिजळ राजाच्या सैन्याशी लढताना वीरमरण आलेली सर्व शरणी मध्ये उठून दिसणारे व्यक्तिमत्व म्हणजे बसव भगिनी अक्का नागाई !!

क्रांती गंगोत्री अक्कानागंबिके चे गुणवैशिष्ट ,पत्नी गंगाबिका व निलांबिका या त्रिवेणी शक्तीमुळेच बसवण्णासारखे दिवे व्यक्तिमत्व उदयास आले .

नागमा प्रतिभासंपन्न होती, शरणी मुक्ताईचे बंधुप्रेम लखमा ची कार्य निष्ठा अशाप्रकारे स्वतः हतबल न होता कल्याण क्रांतीनंतर सुद्धा वचनाचे साहित्याचे रक्षण करण्यामध्ये अनेक महिलांनी या ठिकाणी आपला क्रांतिज्योत तेवत ठेवली

एकाच ठिकाणी एकाच वेळी असंख्य महिला सर्वांनी एकत्र येऊन क्रांती केलेली पाहून मस्तक विनम्र होते

स्त्रियांना कर्मकांड, उपासतापास ,यामध्ये गुंतवून ठेवले या रुढीचा स्त्री गुलाम होती ,महात्मा बसवण्णा यांनी लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले नाहीतर त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येणार नाही असे कायमस्वरूपी समतेची समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या तत्त्वज्ञानात आकाशाला कवेत घेण्याची स्वप्ने होती पण मातीचा गंध हरवला नव्हता ,त्यांच्या विचारात तेजाचा प्रकाश होता पण मातीचा ओलावा लोप पावला नव्हता त्यांनी स्थापन केलेला अनुभव मंडप म्हणजे सामान्य माणसाच्या वेदनेवर मानवी मूल्यांची उजळ माथ्याने उधळणारी मुक्ताफळे होती ,

समता मानवतेच्या तत्वाची चर्चा करणारी एक धर्मसंसद म्हणजे अनुभव मंडप होती ,

विषमता अज्ञानाच्या जगामध्ये तळपणाऱ्या जीवांना जीवन जगण्याची कला शिकविणारा विद्यापीठ होतं अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here