



✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी,चामोर्शी)मो:-9850801314
आष्टी(दि.1मे):- महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस स्टेशन आष्टीच्या वतीने कुंदन गावडे साहेब, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी जिल्हा गडचिरोली यांच्या पुढाकारातून तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैनगंगा नदी घाटाच्या किनारी स्मशानभूमीलगत नागरीकांना विसावा मिळावा म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अपघात झालेल्या व्यक्तीला व गरजवंतांना रक्ताचा तुटवडा भासू नये व वेळेवर रक्ताचा पुरवठा व्हावा म्हणून ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे सामाजिक बांधिलकी जोपासत आष्टी पोलिस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात पोलिस कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व रक्तदान केले. १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.या कार्यक्रमाला प्रामुख्याने गणेश जंगले साहेब, पोलिस उपनिरीक्षक आष्टी, ग्रामपंचायत आष्टीच्या सरपंचा सौ.बेबीताई बुरांडे, प्रा.राज मुसणे, उपस्थित होते.कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.





