Home पुणे पुणे येथे ७ मे रोजी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा मेळावा

पुणे येथे ७ मे रोजी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा मेळावा

256

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

पुणे(दि.1मे):-माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पुणे जिल्हा व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रशिक्षण शिबीर शनिवार दि. ७ मे २०२२ रोजी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , मालधक्का चौक येथे सकाळी ०९ ते सायंकाळी ०४ या वेळेत आयोजित केला असुन यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर , कार्याध्यक्ष शेखर कोलते , ज्येष्ठ मार्गदर्शक प्रल्हाद कचरे, विवेक वेलणकर , यशदाचे दादू बुळे , रेखा साळुंखे , आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहे.याबाबतीत राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी दिलेल्या माहितीनुसार या मेळाव्यासाठी नोंदणी आवश्यक असुन बुधवार दि. ०४ मे पर्यंत नोंदणी चालू राहील.

माहिती अधिकार कार्यकर्तांना दिशा, येणारे आव्हाने ,वाढते हल्ले , खोटे गुन्हे यांसह अनेक समस्यांसह ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून पुणे विभागीतील पुणे,सातारा,सांगली, कोल्हापुर, सोलापुर सह महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार असुन या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी
राहुलकुमार अवचट -9890007025
अब्राहम आढाव – 9890242364
चंद्रकांत भवारी – 9922999797
राजेंद्र ढमढेरे पाटील -8329034311
यांच्याशी संपर्क करावा असे सांगितले
तसेच माहिती अधिकार कायद्यासाठी कार्य करणारे राज्यातील सर्वच कार्यकर्ते , संघटना, विद्यार्थी , सामाजिक कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here