




✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)
धरणगांव(दि.1मे):- श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी निलेश रावा माळी यांची निवड करण्यात आली होती गेल्या काही वर्षात संघटनेचे काम अविरत पणे पार पाडत होते त्या कामाची पोच पावती म्हणून त्यांची पदोन्नती करून त्यांची जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख पदी चोपडा येथे निवड करण्यात आली.
त्यावेळी निवड पत्र संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, राष्ट्रीय सचिव सुनील गुलदगड यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांच्याकडून देशसेवा समाजसेवा अध्यात्मिक सेवा घडावी यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या…..याप्रसंगी चोपडा येथील माळी समाज अध्यक्ष, पंच सर्व समाज बांधव व संत सावता माळी युवक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




