



✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.1मे):-स्टेशन येथील रेल्वे ठेका सफाई कामगार यांची मिटिंग पुणे कार्यालयात घेण्यात आली. मिटिंगमध्ये कोल्हापूर स्टेशन येथे स्वतंत्र रेल ठेका मजदुर युनियन ची शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रथम प्रमुख कार्यकर्त्यांना सभासद करून घेण्यात आले नंतर सर्व कामगारांना सभासद करून घेण्यात यावे असे ठरविण्यात आले..मिटिंगमध्ये कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
सदर मिटिंगमध्ये स्वतंत्र मजदुर युनियन(ILU) चे पुणे जिल्हा सेक्रेटरी चंद्रकांत कांबळे साहेब व स्वतंत्र रेल ठेका मजदुर युनियन चे राष्ट्रीय संघटक संदिप गायकवाड यांनी कामगारांना संबोधित केले.व युनियन वाढीसाठी अक्काताई गायकवाड,मंगल बनसोडे,दत्ता नाना गायकवाड,आकाश कांबळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करणार असे सांगितले.


