



🔹सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुबईचे काकासाहेब कोयटे यांची उपस्थिती
✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.1मे):;जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिमुरचे नवीन इमारतीचे उदघाटन येत्या ८ एप्रिलला होणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमुरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सांगळे, उदघाटक सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, प्रमुख पाहुणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूरचे प्रशांत धोटे, सहायक निबंधक सहकारी संस्था चिमुरचे एस. बी. सहारे, सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक चंद्रपूर पंजाबराव मडावी, पोलीस स्टेशन चिमुरचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे, सहायक सहकारी संस्था वरोराचे मुख्य लिपिक एस. बी. चव्हाण, सीडीसीसी बँक व्यवस्थापक प्रशांत काळे, श्री कन्यका नागरी सहकारी बँक व्यवस्थापक विवेक कळमकर, एबीआय व्यवस्थापक निलेश कायंदे, व्यापारी असोसिएशन चिमूरचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, उपाध्यक्ष श्याम बंग, सचिव बबन बन्सोड, माजी अध्यक्ष भिमराव ठावरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिमुरचे अध्यक्ष सुभाष शेषकर, सचिव रामभाऊ खडसिंगे, उपाध्यक्ष डॉ. गजानन बन्सोड, संचालक डॉ. संजय पिठाडे, डॉ. चंद्रभान खंगार, डॉ. राजू कसारे, अफरोज पठाण, रंगनाथ बांगडे, गजानन कारमोरे, मनीष नंदेश्वर, योगेश भिडेकर, नर्मदा भोयर, डॉ. पोर्णिमा खानेकर, केशवराव वरखेडे, मंगला वेदी, सपना गम्पावर, ज्योत्सना सिंगनजुडे, सुरेश डफ, व्यवस्थापक मिलिंद जांभुळे यांनी केले.


