




✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेडदि.25एप्रिल):-येथील प्रख्यात साहित्यिक व मिलिंद महाविद्यालय मुळावा येथील मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ . अनिल काळबांडे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा .ज्योती काळबांडे यांनी अनुभवलेल्या 7 देशातील प्रवास वर्णनाचे ‘ वेगळे जग ‘ या प्रवास पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मालदिव या देश्यातील माले शहरात 15 एप्रील ते 19 एप्रील दरम्यान आयोजित शब्द चे सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, उद्घाटक सिनेअभिनेते मंगेश सातपुते, प्रसिद्ध शायरा अखिल भारतीय उर्दु मुशायरा रेखा किंगर, प्रख्यात साहित्यिक बाळासाहेब तोरसकर , श्रीमती फर्जाना डांगे, डॉ. अलका नाईक यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला.
डॉ. अनिल काळबांडे व प्रा. ज्योती काळबांडे यांनी शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या माध्यमातून थायलंड, दुबई, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका सह भुटान, तायवान या देशांमध्ये जी भ्रमंती केली त्या भ्रमंतीमध्ये त्यांना आलेले राजकीय सामाजिक शैक्षणीक एकंदरीत त्या देशातील वेगळेपण, संस्कृती त्या देशातील चालीरीती, त्या देशातील भाषा, त्या देशातील साहित्य या संदर्भात आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला.
या पुस्तकाला प्रख्यात विचारवंत तथा दै. लोकमतचे पुणे येथील संपादक संजय आवटे यांची प्रस्तावना वजा पाठराखण केली.
तर शब्द च्या राज्य उपाध्यक्ष शशी डंभारे यांनी सुद्धा या पुस्तकात आपली भूमिका व्यक्त केली.
या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी लेखिका प्रा. ज्योति काळबांडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, संजय सिंगलवार या अवलिया रसिकांने संपूर्ण विश्वामध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे जे कार्य हाती घेतले त्यामध्ये आमच्यासारखे नवनवे लोक या प्रवाहात आले ऐकमेकांशी जुळले गेले आणि त्या प्रवाहातच ‘वेगळे जग ‘ या पुस्तकाची निर्मिती झाली . यावेळी शब्दाचे संयोजक 1 संजय सिंगलवार यांनी हे पुस्तक म्हणजे शब्द परिवाराचा आत्तापर्यंत झालेल्या प्रवाहाचा इतिहास असल्याचे वर्णन केले.
माले शहरात शब्द च्या सहाव्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन शशी डंभारे यांनी केले तर प्रस्तावना सुहाष मोरे यांनी केले तर आभार स्वाती ठुबे यांनी मानले.
संपुर्ण देश्यातून आलेले साहित्यिक डॉ प्रियदर्शनी देशमुख, प्रा . आनंद वाघमारे, प्रा.अशोक कुमार तिवारी, संदीप गाडगे, डॉ प्रदीप इंगोले, प्रसिद्ध मालवणी अभिनेत्री कल्पना बांदेकर , कुमार कांबळे विद्या कदम, हर्षवर्धन पाटील, ऐश्वर्या पाटील, यश सिंगलवार, वर्षा सिंगलवार, रवींद्र खैरे, छाया पाटील यांनी या पुस्तकात शुभेच्छा दिल्या.




