Home महाराष्ट्र सायगाव येथे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार...

सायगाव येथे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टी संपन्न

217

🔹मौलवि व मुस्लिम बांधवांसोबतच हिंदू बांधवांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग

✒️अंबाजोगाई प्रतिनिधी(शेख फिरोज)मो:-7020475287

अंबाजोगाई(दि.1मे):- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी काल सायगाव येथील सुप्रसिद्ध दर्ग्या परिसरात मुस्लिम व हिंदू बांधवांसाठी रोज इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . या इफ्तार पार्टीस दर्ग्याच्या मौलवी , गावातील मुस्लिम बांधव व हिंदू बांधव देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .

नामदार धनंजय मुंडे हे केवळ मतदार संघातील बांधवांचा विचार करत नसून ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी व त्यांच्या उन्नतीसाठी सदैव कार्यतत्पर असतात . नामदार धनंजय मुंडे यांच्या वतीने रमजानच्या पवित्र महिन्यात निराधार व गरजुना ईदसाठी लागणारे साहित्य व सुकामेवा मोफत उपलब्ध करून दिला जातो . तसेच मतदार संघातील लोकांच्या सुखदुःखात सदैव धावणारे धनंजय मुंडे हे मतदारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत . तसेच माजी सरपंच बताउल्ला हाश्मी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन १३ सदस्य असलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या सायगाव सोसायटीच्या सर्व सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला .

सायगाव येथील इफ्तार पार्टीस नामदार धनंजय मुंडे यांच्या सोबत विधान परिषदेचे आमदार संजय दौंड , बीड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण , अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी ,माजी आमदार पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील , बबन भैय्या लोमटे , ताराचंद शिंदे , आसेम अली उस्मानी , खिलाफत अली , तानाजी देशमुख , गोविंद देशमुख ,राणा चव्हाण, खलील जाफरी यांच्यासह आदीजन उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here