



✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
चोपडा(दि.1मे):- येथे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचीनभाऊ गुलदगड व महाराष्ट्र राज्याचे सचिव सुनिलभाऊ गुलदगड यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी समाजामध्ये उच्चतम कामगिरी करणाऱ्या तरुण वर्गाचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.समाजात संत सावता माळी महाराज , महात्मा जोतीबा फुले व सावित्री आई फुले यांचे स्थान व कार्याचा आढावा या प्रसंगी सुनील भाऊ गुलदगड यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केला. आज राज्यात सावता महाराज यांचे जन्म स्थळ अरण हे तिर्थक्षेत्र घोषीत व्हावे यांसाठी लोकशाही मार्गाने सबंध महाराष्ट्रभर लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुनील भाऊ गुलदगड यांनी केले. याप्रसंगी लासुर येथील माळी समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नानासो गंभीर सर यांनी प्रास्ताविकातून चोपडा शहर व तालुका कार्यकारणी च्या कार्यक्रमाचा आलेख मांडला. महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊ गुलदगड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की चोपडा शहरात आधी महात्मा जोतीबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा करण्याचा मानस युवक संघटनेच्या वतीने सदैव कार्यतत्पर राहून केला आहे.
तसेच नगरपालीका किंवा आमदार निधीतून महामानवांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निवेदन येणाऱ्या ११ मे महात्मा दिनाच्या दिवशी महाराष्ट्रभर करण्यात येईल असे प्रतिपादन करण्यात आले. आणि ११ मे ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान केल्याच्या प्रित्यर्थ साजरा करणाऱ्या महात्मा दिनानिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम राबविणे या विषयी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.या प्रसंगी चोपडा,धरणगाव ह्या तालुक्यांचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन व उपजिल्हाध्यक्ष अल्केश भाऊ महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीचा प्रस्ताव मांडून मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी वाघोदा येथील संजय माळी तर चोपडा येथील नरेंद्र नामदेव महाजन सर यांची जिल्हा कार्याध्यक्ष,धरणगाव येथील निलेश रावा माळी यांची जिल्हा संपर्क प्रमुख, तर जिल्हा संघटक म्हणुन रावेर येथील ईश्वर महाजन, आणि जामनेर येथील पंकज सातव यांची जिल्हा सह संपर्क प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच संध्या महाजन जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष यांच्या वतीने महिला आघाडीत सुद्धा विविध महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
पुढील संघटन वाढविण्यासाठी समाजाच्या विविध उपक्रमा शिवाय इतर एकत्रीकरण यावर वरीष्ठ मार्गदर्शक तसेच स्थानिक पद्धिकारी यांना विश्वासात घेवुन पुढील कार्यक्रम यांचे नियोजन करावे संघटन करावे संघटन मजबूत कसे होईल या संदर्भात देखील प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा पदाधिकाऱ्यांनी विचार करावा असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भाऊ महाजन व खान्देश विभागीय संपर्कप्रमुख समाधान माळी सर यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी फुल माळी समाज पंच मंडळ मोठा माळीवाडा चोपडा तसेच मल्हार पुरा, पाटील गडी लहान माळीवाडा व पंचक्रोशीतील समस्त माळी समाजातील पंच मंडळी व श्रेष्ठ मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा शहरातील युवक संघटनेचे पदाधिकारी रोहित माळी, विठ्ठल माळी, मयूर माळी,स्वप्नील माळी,भावेश माळी, महेंद्र भामरे,गिरीश माळी, राकेश माळी,विकी भाऊ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे अतिशय बहारदार सूत्रसंचालन नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन सर यांनी केले तर आभार आभार प्रदर्शन खानदेश विभागीय संपर्कप्रमुख समाधान माळी यांनी मानले.खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मणभाऊ माळी हे खाजगी कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी आपल्या शुभेच्छा याप्रसंगी कळविल्या.


