Home बीड सामाजिक सलोखा बिघडवणा-या समाजकंटकावर कारवाईसह शासकीय आधिका-यांनी दफ्तर दिरंगाई न करता संविधान...

सामाजिक सलोखा बिघडवणा-या समाजकंटकावर कारवाईसह शासकीय आधिका-यांनी दफ्तर दिरंगाई न करता संविधान संमत कार्य करण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनी संविधान पठण आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

120

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.30एप्रिल):-महाराष्ट्र राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवुन धार्मिक, जातीय ताणतणाव निर्माण करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह शासकीय आधिका-यांनी कामात दफ्तर दिरंगाई न करता संविधान संमत नियमानुसार वेळेवर कामे करावीत या मुख्य मागणीसह कायदा व सुव्यवस्था, जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात उपआयुक्त (पुरवठा) औरंगाबाद वामन कदम यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सुद्धा गुन्हे दाखल न करणे, कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील खरेदी गैरव्यवहार प्रकरणात तसेच संपुर्ण खर्चाचे ऑडीट करून उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी,महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत आदि अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “भारतीय संविधान पठण आंदोलन करण्यात येणार आहे.

 

उप आयुक्त (पुरवठा)औरंगाबाद वामन कदम यांनी ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात गुन्हे दाखल करा
______
उप आयुक्त(पुरवठा)औरंगाबाद वामन कदम यांनी दि.१८ एप्रिल २०२२ रोजी ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा आधिकारी बीड यांना आदेश देऊन सुद्धा अद्याप १० दिवसानंतर सुद्धा गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित प्रशासकीय आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.

बीड जिल्ह्य़ातील दलित स्मशानभुमीबाबत ठोस निर्णय घ्यावा, निधी उपलब्ध करून द्यावा
____

बीड जिल्ह्य़ातील दलित स्मशानभुमीचा प्रश्न ऐरणीवर असुन केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) गावात ३ महिन्यात ३ वेळा दलित महिलांचा अंत्यविधी रोखण्यासारख्या घटना घडल्या असून संबधित प्रकरणात दोषींवर व जबाबदार आधिकारी तहसिलदार दुलाजी मेंडके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन सामाजिक तणाव वाढु नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्य़ातील दलित स्मशानभुमीबाबत ठोस निर्णय घ्यावा.

कोरोना कालावधीत खर्चाचे ऑडीट करून खरेदी तसेच कंत्राटी भरती गैरव्यवहार प्रकरणात स्वतंत्र उच्च स्तरीय कमिटीमार्फत चौकशी करावी
_____
कोरोना कालावधीत आरोग्य विभागाला दिलेल्या निधीतून खरेदीमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झालेला सीसीटीव्ही,रेमडीसिवीर इंजेक्शन, सॅनिटायझर आदि. खरेदीबाबत खर्चाचे ऑडीट करण्यात येऊन उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच कोरोनाकाळात कंत्राटी कर्मचारी भरतीमध्ये मोठ्याप्रमाणात अनियमितता व अतिरिक्त मनुष्यबळ भरती प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी अजित कुंभार यांनी केलेल्या चौकशीनंतर दोषी आरोग्य विभागातील आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी असे नमूद असतानाही संबधित प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी.

बीड नगरपरीषदेतील अनागोंदी कारभार व गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करा
____

बीड शहरातील नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत तसेच खोटी माहिती प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छता सर्व्हेक्षण २०२०-२१ मध्ये ६७ वा क्रमांक केल्याबद्दल मुख्याधिकारी नगरपरिषद बीड डाॅ.उत्कर्ष गुट्टे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा येऊन स्वतंत्र उच्च स्तरीय कमिटीमार्फत प्राप्त मानांकनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here