




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.30एप्रिल):-आई रेखाताई क्षीरसागर यांचे अकाली निधन झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरुन इतर सर्व विधी उरकून दहावा होताच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर कामाला लागले. रमजान ईदचा सण जवळ आल्याने सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.
क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांचे अकाली निधन झाले. क्षीरसागर कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यात पुन्हा सर्व विधी करायची जबाबदारीही मोठा मुलगा असल्याने संदीप क्षीरसागर यांच्यावरच. पण, शहर आणि मतदार संघातील सामान्यांच्याही आपल्याकडून मोठ्या अपक्षेा असल्याची जाणीव संदीप क्षीरसागर यांना असल्याचे शनिवारच्या त्यांच्या कृतीने अधोरेखित केले.
त्यांच्या आई अगदीच धार्मिक व अध्यात्मिक असल्याने शुक्रवारी त्यांचा दहावा तिर्थक्षेत्र पैठणला विधीवत पार पडला. लागलीच शनिवारी आमदार क्षीरसागर यांनी बीड शहरातील पाणीप्रश्न हाती घेतला. मागच्या काही वर्षांपासून शहरातील पाणी पुरवठा नियोजन ढासळलेले आहे. पुरेसे पाणी उपलब्ध असूनही नियोजनाअभावी बीडकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. आता मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण जवळ आला आहे. दरम्यान, शहरातील काही प्रभागांत सुरळीत पाणी पुरवठा सुरु झाला असला तरी उर्वरित प्रभागांत नियमित पाणी मिळावे आणि सणात मुस्लिम बांधवांना पाणी मिळावे यासाठी ते कामाला लागले. शनिवारी डोक्याला गमचाचे टाफर बांधून भर उन्हात संदीप क्षीरसागर पाईपालाईल लिकेज असलेल्या ठिकाणी तसेच जलशुद्धीकरण व साठवण प्रकल्पाच्या ठिकाणीही ते गेले.
रमजान ईदला होणाऱ्या सामुदायिक नमाजसाठीच्या इदगाह मैदानाचीही पाहणी केली. या ठिकाणी स्वच्छतेबाबतही त्यांनी सुचना दिल्या तसेच तयारीची पाहणी केली. त्यांच्यासोबत माजी आमदार सय्यद सलिमही होते




