Home महाराष्ट्र नाशिक रोड येथील जनता विद्यालय गांधीनगर येथे आय.सी.टी संगणक लॅबचे उद्घाटन संपन्न

नाशिक रोड येथील जनता विद्यालय गांधीनगर येथे आय.सी.टी संगणक लॅबचे उद्घाटन संपन्न

231

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.30एप्रिल):–आज दिनांक 30/4/2022 शनिवार रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय गांधीनगर नाशिक येथे ICT संगणक लॅब तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्रजी बच्छाव सर यांचा सेवापुर्ती समारंभ मोठ्या उत्साहात मराठा विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती. निलीमाताई पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष श्री. नानासाहेब महाले हे होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दैनिक सकाळचे माजी संपादक जेष्ठ साहित्यीक उत्तमराव कांबळे, माजी महापौर अशोकभाऊ दिवे, संचालक भाऊसाहेब खताळे, सचिनदादा पिंगळे, गुलाबराव भामरे, डॉ. श्री. एस के शिंदे, शिक्षणधिकारी श्री. सि डी शिंदे तसेच शिक्षण समितीचे सदस्य शालेय पर्यवेक्षक शिक्षक कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमात शालेय शिक्षण समिती सदस्य तथा रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांना भारताचे संविधान प्रत देऊन गौरविण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here