Home बीड अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

240

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.30एप्रिल):- जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे. जनतेचे रक्षकच भक्षकांच्या भूमिकेत जेव्हा समोर येतात, तेव्हा सुरक्षेसोबतच विश्वासाचा पेच निर्माण होतो. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीडमधील अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी लाच मागितली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, संबंधित पोलिसांनी तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तर तडजोडअंती 15 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करण्यात आले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

नितीन चंद्रकांत चौरे (वय 33, पोलीस नाईक), प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर) (वय 51 सहा. पोलीस उपनिरीक्षक) अशी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीसांची नावे आहेत. चौरे व सेंगर यांनी तक्रारदारास त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. ही लाच 28 फेब्रुवारी 2022 रोजी मागितली होती. 2 मार्च 2022, 3 मार्च 1 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. म्हणून याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हात्रे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here