



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.30एप्रिल):- शारदा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडून शनिवार, १४ मे २०२२ रोजी २३ व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी इच्छुकांनी शारदा प्रतिष्ठानच्या कार्यालयात वधु-वरांची आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करण्याचे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, शारदा प्रतिष्ठानकडून अतिशय शिस्तबध्द व नेत्रदिपक सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मागील २२ वर्षे सातत्याने सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणारी शारदा प्रतिष्ठान ही राज्यातील एकमेव संस्था आहे. कोरोना संक्रमणाच्या कालावधीत दोन वर्षे सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला नाही. यावर्षी प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि.१४ मे रोजी सामुहिक विवाह सोहळा विविध संत-महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द होणार्या जोडप्यांना नियमाप्रमाणे मिळणारे शासन अनुदान, वधु-वरांचा संपुर्ण पोशाख, पादत्राणे, मणीमंंगळसुत्र यांसह संसारोपयोगी साहित्याचा संच प्रतिष्ठानकडून भेट दिला जाणार आहे.
विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून गेवराई येथील जगदंबा आयटीआय येथे विवाह नोंदणी कार्यालय सुरु करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी आवश्यक कागदपत्रांसह वधु-वर नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





