



✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)
परळी(दि.30एप्रिल):-तालुक्यातील सर्वात मोठे पोलिस ठाणे म्हणून ओळखले जाणारे सिरसाळा हे असुन या ठिकाणी दि. २८/४/२२ गुरूवार रोजी सिरसाळा पोलीस बांधवाच्या वतीने पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने हिंदू – मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित आणुन ईफत्तार पार्टी उत्सहात दिली.
यावेळी पो.निरीक्षक प्रदीप एकशिंगे,पो.उप.निरीक्षक. शेळके,सिरससाळा सर्कल चे (अमीर)मौ.अनसार ,मौ.मोईन कास्मी,मौ.अख्तर,हाफेज अली,मौ.सिद्दीख,सिरसाळा ग्रामपंचायत चे उप सरपंच इम्रान पठाण,उत्तम माणे (तात्या), औरंगपूरचे माजी सरपंच हनुमंतनागरगोजे,शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष (नासर दादा) शेख रफिक (सेठ) सिरसाळा पञकार संघाचे अध्यक्ष मिलिंद चोपडे,पञकार संघाचे सचिव जावेद पठाण, बीड सिटीझन चे पञकार रफिक पठाण,अशोक गलांडे,अतुल बडे, धर्मा मेंडके ,सह सर्व जाती धर्मातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा (रोजा) ईफत्तार पार्टी चा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सिरसाळा पोलिसांनी अथक परिश्रम घेतले सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते मुस्लिम बांधवांनी मानले पोलीस बांधवांचे आभार.


