Home महाराष्ट्र आदर्श तलाठी म्हणून बीड जिल्ह्यातुन विष्णू गित्ते यांची शासनाकडून निवड

आदर्श तलाठी म्हणून बीड जिल्ह्यातुन विष्णू गित्ते यांची शासनाकडून निवड

292

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.30एप्रिल):-तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव सज्जाचे तलाठी विष्णू शामराव गित्ते (माजी सैनिक) यांची महाराष्ट्र शासनाने आदर्श तलाठी म्हणून जिल्ह्यातून निवड केली आहे.विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे मार्फत जिल्हाधिकारी बीड यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे सन 2021-22 सालासाठी बीड जिल्ह्याचे आदर्श तलाठी म्हणून निवड झाली आहे.

माजी सैनिक असलेले तलाठी विष्णू गित्ते यांच्याकडे सज्जा वडगाव दादाहारी तसेच सज्जा परळी वै व सज्जा जिरेवाडी यांचा अतिरिक्त पदभार असून ते अतिशय शिस्तप्रिय, लोकाभिमुक व कामकाजात अतिशय कार्यक्षम आहेत. महसूल प्रशासनाची अत्याधुनिक व संगणकीय कार्यप्रणाली आत्मसात करुन याबाबत सर्व तलाठी यांना मार्गदर्शन करणारे विष्णू गित्ते माजी सैनिक या प्रवर्गातून सन 2011 साली तलाठीपदी नेमणूक झाली असून ते नेहमी आपल्या कामाला सर्वोच्च प्राधन्य देत आलेले आहेत. विष्णू गित्ते यांना अगोदर परळी तालुक्यातील वडगाव दादाहारी सज्जातील पूर्ण गावांचे अतिशय जलद गतीने 100% सातबारा संगणीकरण केल्याबद्दल तसेच इतर तलाठी यांना मार्गदर्शन करून परळी तालुक्यातील सातबारा संगनिकरणात मोलाचे योगदान केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी एम डी सिह यांनी सन 2018 मध्ये सन्मानित केले होते.

विष्णू गित्ते यांनी सन 2021 -22 या वर्षामध्ये शासनाने नेमुन दिलेले इस्टांकाप्रमाणे शासकीय वसुली, ग्रामीण व शहरी भागातील कोविड 19 विषयक सर्व कामे, तसेच परळी शहरात झालेली अतिवृष्टी बाबत कामकाज आणि शेतकर्‍यांचे अतिवृष्टी अनुदान वेळेवर वाटप करणे व इतर महत्वाची उत्कृष्ट कार्य केल्याने उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व तहसिलदार सुरेश शेजूळ यांनी जिल्हधिकारी बीड यांच्याकडे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवला. तो विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचेकडून मंजूर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार हा 1 मे रोजी पोलीस ग्राउंड बीड येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी बीड यांचे हस्ते देण्यात येणार आहे .बीड जिल्हा आदर्श तलाठी म्हणुन माजी सैनिक तलाठी विष्णू गित्ते यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, मंडळ अधिकारी आर. बी. कुमटकर, सौ. मंगल मुंडे, किशोर तांदळे, सूर्यवाड तसेच तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री परमेश्वर राख ,परळी तालुक्यातील सर्व तलाठी ,महसूल सहायक व इतर कर्मचारी यांनी विष्णू गित्ते यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here