



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
🔹एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती गंभीर जखमी, चंद्रपूर येथिल मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू
घुग्घुस(दि. 29एप्रिल):-सकाळी नकोडा येथील आसम यांच्या घरगुती गॅस संपल्यामुळे इंडियन गॅसचे नवे सिलेंडर लावण्यात आले, त्यावेळी अचानक गॅस सिलेंडरचा भयानक स्फोट झाला. सदर स्फोट मध्ये सोडोनि आसम (पती), अनिता आसाम (पत्नी), रोहित आसम (मुलगा) हे गंभीर जखमी झाले.
माजी जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या माध्यमातून जखमी परिवारांना प्रा. आरोग्य केंद्र घुग्घुस येथे प्राथमिक आरोग्य उपचारार्थ नेण्यात आले. यावेळी डॉ. देशभक्तार यांनी उपचार केला व समोरील उपचारासाठी रुग्णांना चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाला हलविण्यात आले.
ब्रिजभूषण पाझारे यांनी महाविद्यालयाचे डीन यांच्याशी संपर्क साधून तत्काळ उपचार करण्यास माहिती दिली आहे.


