



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.29एप्रिल):-वार शुक्रवार या दिवशी गंगाखेडचे नायब तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री याना
गंगाखेड येथील मातंग व सर्व समाज बांधवांन कडून निवेदन देण्यात आले यात औरंगाबाद येथील मोहन आवाड यांच्या हतेचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच आरोपींना फाशीची शिक्षा जलदगती न्यायालया मार्फत देण्यात यावी. आवाड यांच्या पनास लाखाची मदत करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांच्या पत्नीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे.
व आवाड यांच्या परिवाराच पुनर्वसन करण्यात यावे.दोन समाजात तेढ निर्मान करणारी घटना असलया मुळे सी बी आई मार्फत चौकशी करण्यात यावी हि घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळींबा फासणारी आहे.निवेदनावर. रोहिदासजी लांडगे महाराष्ट्र जन क्रांती सेना व चंद्रकात खंदारे नगरसेवक. बबलु अवचार सामाजिक कार्यकर्ते व सुरेश उफाडे. किरण उफाडे. ओमकार अवचार. शैलेश उफाडे. अंकुश कांबळे. बालु बाळसकर इत्यादि सामाजिक कार्यकर्ते च्या सहया आहेत


