




✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308
कुरुल(दि.28एप्रिल):-ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे या रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी पंढरपूर या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेऊन करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत ओबीसी बांधव छत्रपती शिवाजी चौकातून महाद्वारकडे श्री विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी गेले दर्शनानंतर ओबीसी बांधवांना संबोधित करताना रमेश बारसकर यांनी सांगितले की,आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजातील सुमारे 56 हजार लोकप्रतिनिधी वंचित राहणार आहेत. ओबीसी समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांना प्रवाहात आणण्यासाठी लोक प्रतिनिधी सभागृहात असणे गरजेचे आहे परंतु आरक्षण गेल्यामुळे ओबीसींचे प्रतिनिधी होऊ शकणार नाही त्याकरिता सर्व ओबीसी बांधवांनी आता रस्त्यावरची लढाई लढणे काळाची गरज आहे अन्यथा येणारी पुढे आपल्याला माफ करणार नाही
ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेली रथयात्रा ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही त्यामुळे ओबीसी म्हणून वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या समाजाकरता पक्षाचे जोडे बाजूला ठेवून येत्या 17 मे ला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसींची ताकद दाखवण्याची आवश्यकता असल्याचे मत रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.
या रथयात्रेच्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते दिलीप बापू धोत्रे ज्योती क्रांती परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय दुधाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष देसाई, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुनंदाताई फुले,उपाध्यक्ष अरविंद राऊत,उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष लोमेश काळे, उद्योजक बाळासाहेब चिकलकर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बीराप्पा मोठे, ज्योती क्रांती परिषदेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष शुक्राचार्य गवळी शहराध्यक्ष सचिन देवमारे,माळशिरस तालुका अध्यक्ष सागर यादव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ साधनाताई राऊत,महिला आघाडीच्या मोहोळ तालुका अध्यक्ष संगीता ताई पवार,अनिता बळवंतकर,वर्षाताई दुपारगुडे,मोहोळचे नगरसेवक अतुल क्षिरसागर प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर,जिल्हा कार्याध्यक्ष सागर अष्टुळ,तन्वीर शेख,शाखाध्यक्ष बाळासाहेब माळी,श्रीकांत गाढवे संघटक जितेंद्र अष्टुळ,शेखर माने,उमेश गोटे,सिद्धार्थ एकमल्ले, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




