



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.२८एप्रिल):- राज्यात भोंग्याचे राजकारण पेटले असताना, बीडच्या गेवराई तालुक्यातील एका तरूणाने, भोंगा घेऊन भोंग्याच्या विरोधात जनजागृती अभियान सुरू केले आहे. गावागावातील सलोखा टिकवून ठेवण्यासाठी बाळासाहेब मस्के या तरुणाने हा अनोखा उपक्रम राबवला आहे. हनुमान चालीसासह भोंग्याचे राजकारण यावरून महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरामध्ये राजकारण पेटले असताना गाव खेड्यातील सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित रहावे. यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रेवकी गावातील 34 वर्षीय तरुणाने हातामध्ये भोंगा घेऊन गावागावात जागृतीला सुरुवात केले आहे.
बाळासाहेब मस्के असे या तरुणाचं नाव आहे. जनजागृतीच्या माध्यमातून, भोंग्याच्या नावाखाली तरुणांची डोकी भडकावणाऱ्या राजकारण्यांना चांगलीच चपराक दिली आहे. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी गावात जनजागृती करताना, हातामध्ये भोंगा घेऊन भोंग्याचा राजकारणाद्वारे समाजावर होणाऱ्या दुष्परिणाम सांगणाऱ्या तरुणाचे, सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भोंग्याच्या राजकारणाला बळी पडू नका, असा आवाहन हा तरुण गावागावांमध्ये जाऊन करत आहे. काही दिवसापासून या तरुणांना जनजागृतीचा वसा हाती घेतला आहे.





