Home महाराष्ट्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी, येथील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांची “रामदेव बाबा साल्वंट राईस...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी, येथील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांची “रामदेव बाबा साल्वंट राईस ब्रेन ऑइल कारखान्याला” प्रत्यक्षात भेट

184

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28एप्रिल):-स्थानिक ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील, शाखा वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट सहल बुधवार, दिनांक 27 एप्रिल 2022 ला आयोजित करण्यात आली होती. वाणिज्याचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रियेचे प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभूती व्हावी, याकरीता दरवर्षी उद्योग भेट च्या माध्यमातून औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात येते.

त्यानुसार, ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध रामदेव बाबा साल्वंट राइस ब्रान ऑइल फॅक्टरीला बुधवार दि. 27 एप्रिल 2022 ला भेट देण्यात आली. या कारखान्यांमध्ये राइस ब्रान पासून खाण्याचे गोडे तेल उत्पादित करण्यात येते. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापासून ते शुद्ध गोडेतेल उत्पादन होण्यापर्यंत सर्व प्रक्रियांचे अध्ययन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. त्याचप्रमाणे या सर्व प्रक्रियेत बाहेर पडणारे बाय प्रॉडक्ट्स व स्क्रॅप मटेरियल व त्याची विल्हेवाट, तेल शुद्ध करण्याची प्रक्रिया, यासाठी लागणारी आवश्यक यंत्रसामुग्री इत्यादींची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट वर्क करण्यास मदत होईल या संपूर्ण उद्योग भेट सहली करिता रामदेव बाबा साल्वंट चे व्यवस्थापक शाहिद शेख यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. तसेच कारखान्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती तसेच उत्पादन प्रक्रियेतील संपूर्ण माहिती चे मार्गदर्शन करणारे तेथील कर्मचारी श्री.फुलझेले यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले करिता वाणिज्य विभागप्रमुख प्रा. इमरान शेख यांनी त्यांचे आभार मानले.

या उद्योग भेट सहलीमध्ये एकूण 35 विद्यार्थी व प्रा.इमरान शेख, प्रा.तेजस गायधने, प्रा.एस.आर.पडोळे आणि प्रा.योगिता रामटेके असे एकूण चार प्राध्यापक सहभागी झाले होते. या संपूर्ण उद्योग भेट सहली करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश एम.कांबळे सर यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here