Home महाराष्ट्र जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेविरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेविरोधात जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

157

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.28एप्रिल):-गुजरात चे आमदार तथा काँग्रेसचे नेते जिग्नेश मेवाणी यांना पंतप्रधानाच्या नावाने ट्विट केल्या प्रकरणी आसाम पोलिसांनी बेकायदेशीर पणे अटक करून त्यांना आसाम ला घेऊन गेले व विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून आमदार जिग्नेश मेवाणी यांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधानाच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्विट करणे हा काही अपराध नाही. लोकशाही व संविधानाने सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु भाजप पक्षाच्या सरकारने मनमाणीपणे, सर्व नियम धुळीस लावून हुकूमशाही मार्गाचा अवलंब करून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील मोदींच्या नेतृत्वावातील भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन करन्यात आले व आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या त्वरित सुटकेकरिता जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपती महोदयांकडे मागणी करण्यात आलेली आहे.

यावेळी प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, घनश्याम वाढई, जितू पाटील मुनघाटे, उपाध्यक्ष अनिल कोठारे, किसान काँग्रेस अध्यक्ष वामनराव सावसागडे , अनुसूचित जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनुसूचित महिला अध्यक्ष अपर्णाताई खेवले, विधा कांबळे, भैय्याजी मुदमवार, प्रभाकर कुबडे, नंदू कायरकर, बाळू मडावी, हरबाजी मोरे, आशिष कामडी, संजय चन्ने, रुपेश टिकले, वसंत राऊत, प्रतीक बारसिंगे, दीपक रामाने, शेषराव तलमके, I. B. शेख, अरुण पुण्यपरेड्डीवार, बाबुराव गडसूलवार, कृष्णा नारदेलवार, कृष्णाजी झंझाल, घनश्याम मुरवतकर, गौरव येनप्रेडीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने, विकास देशमुख , विलास रोहनकर, बंडू भोयर, गितेश देशमुख, गजानन रोहनकर, कुंदन झाडे, भुवन कोसनकार, किरण गेडाम, संजय गोहणे, चंद्रकांत मेश्राम सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleकॅश लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन इसमाना 12 तासात पकडण्यात ब्रम्हपुरी पोलीस यशस्वी
Next articleप्रथमतः फिरत्या चित्रकारीने प्रसिद्धी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here