Home महाराष्ट्र मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करा !

मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करा !

408

🔹८ दिवसात ग्रामीण भागातील बससेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा ईशारा !

🔸रुपेश वाळके यांची विभाग नियंत्रकाकडे मागणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.27एप्रिल):-कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील नियमित वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शालेय वेळेत सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी बस अभावी शिक्षणापासून वंचित राहत आहे.मागील दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील बससेवा बंद आहे. ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना ये-जा करण्यास आर्थिक दंडासह मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खासगी ऑटोरिक्षा चालकाकडून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. गोरगरीब ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण होतांना दिसत आहे.

मोर्शी हे तालुक्यातील सर्वात महत्वाचे व मोठी बाजारपेठ असल्याने व शासकीय कार्यालयीन कामांसाठी खूप लोकांना तालुक्याला ये जा करावे लागत असल्यामुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असून आता तरी ग्रामीण भागातील बससेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे.

मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये बससेवा बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, सामान्य मानसाला , शेतकऱ्यांना खरेदी व सर्वसाधारण व्यवहारासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या आडचनीचा सामना करावा लागला. सध्या खाजगी रिक्षा जीप वाले अव्वा च्या सव्वा पैसे घेऊन ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक लूट करीत आहेत तसेच जीप, रिक्षांची पूर्ण भरती झाल्याशिवाय जीप रिक्षा, निघत नाहीत त्यामुळे जनतेचा वेळ व पैसे वाया जात असून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयात हजारो विद्यार्थी नियमित शिक्षण घेतात. शिक्षण घेण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून बाहेरील गावाहून मोर्शी येथे येतात. या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये बसफेऱ्या बंद असल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असून विद्यार्थ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी बस नसल्याने शाळेमध्ये व विवीध प्रशिक्षणाला न जाण्याचेच पसंत केले आहे. शाळेत कसे जायचे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद असणारी एस. टी ग्रामीण भागात अद्याप बंद असल्याने मोर्शी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना व ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ विभागीय नियंत्रक यांच्याकडे केली असून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here