



✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.27एप्रिल);– कोरपना येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था र.न HB. 165 चा पीक कर्ज वाटप शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित बँकेचे संचालक आदरणीय विजय बावणे संस्थेचे उपाध्यक्ष रासेकर बँक व्यवस्थापक सय्यद साहेब,बँक निरीक्षक मालेकर साहेब बँकेचे सचिव हेमंत एस लोडे,लिपिक शब्बीर शेख,शिपाई कवडू मडावी, व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
यावर्षी 2022,23या आर्थिक वर्षा करीता कर्ज वाटप सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी 254 खतेधरक शेतकरी याना 3,61,78300/- रुपियाचे कर्ज वाटप करण्यात आले असून शेतकरी वर्गात संस्थे प्रती आनंद व्यक्त केल्या जात आहे. संस्थेने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक कर्जा चे योजनेचा लाभ घेण्याचे व्यवस्थापक सय्यद साहेब यांनी केले आहे. या प्रसंगी संचालक दादाजी गोवारदिपे,मारोती पारखी,विनोद कोल्हे,आदी उपस्थित होते.





