Home महाराष्ट्र पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

201

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.27एप्रिल):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी साकोली यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.सदर मागण्या संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या सहकार्याने भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करीत असतो. मात्र आज पत्रकारांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून या पत्रकारांच्या विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने पुढाकार घेतला आहे. पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करण्याची आज नितांत गरज आहे. निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत : पत्रकारांना मानधन लागू करण्यात यावे, पत्रकारांना विमा लागू करण्यात यावा, पत्रकार संघटनेला जिल्ह्यात व तालुक्यात जागा व निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शासनाच्या विविध समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून पत्रकाराची नेमणूक करण्यात यावी, पत्रकार क्षेत्रात पाच वर्षे काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रकारांचा दर्जा देण्यात यावा, बातमी व व्हिडिओ संकलन करताना पत्रकारावर अनेक हल्ले होतात.

त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हेगारावर तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करण्यात यावी, पत्रकारांना विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ देण्यात यावा व पत्रकारांना टोलनाक्यावर टोल फ्री करण्यात यावे आदी मागण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे साकोली तालुका अध्यक्ष निलेश झोडे, तालुका सचिव मनीषा काशीवार, तालुका उपाध्यक्ष शेखर इसापुरे, सहसचिव प्राध्यापक चेतक हत्तीमारे, प्रभारी प्रसिद्धीप्रमुख मनोज गजघाट, शहराध्यक्ष ऋग्वेद येवले, उपाध्यक्ष ताराचंद कापगते, सचिव रवी भोंगाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here