Home महाराष्ट्र अमरावती-बोरी बस सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे

अमरावती-बोरी बस सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे

258

🔸खाजगी वाहने नसल्याने विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.26एप्रिल):-कोरोना मधील लॉकडाउन पासून बंद असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती आगार क्र. २ बडनेरा आगाराची अमरावती – बोरी सावनेर मार्गे बस पुर्ववत सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यीप्रवाशांनी प्रशासनाला साकडे घातले आहे.अमरावती-बोरी बस ही बडनेरा आगारातील सर्वाधिक उत्पन्न देणारी बस असून या मार्गावरील ग्रामीण प्रवाशांची व विद्यार्थ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कोरोना लॉकडाउन व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही बस बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

या मार्गावरून खाजगी वाहनांची वर्दळ नसल्याने आपल्या परिवारासाठी बाहेरगावी जाऊन रोजीरोटी कमावणा-या मजूर प्रवाशास तसेच अमरावती, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर येथे शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रवास कशाने करावा हे समजणासे झालंय. दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा जरी आटोपल्या असल्या तरी प्राथमिक, माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयीन परिक्षेला सुरुवात होत असल्याने परिक्षा केंद्रावर कसे पोहचावे असाही प्रश्न विद्यार्थी प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे. खाजगी वाहने आलीत तर ती थांबत नाही, वाहने नसल्याने शाळेला उशीर होतो, परिक्षा असूनही वेळेवर पोहोचता येत नाही.

झालेला पेपर दुसरा दिवशी मिळत नाही, शाळेत जाण्यासाठी जर काही मिळाले नाही तर पालक सुद्धा घरी राहण्यास सांगतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या मार्गावरील अमरावती-बोरी सावनेर मार्गे बस पुर्ववत सुरू करून विद्यार्थी प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी साक्षी जगताप, वैष्णवी बगाडे, जगदीश मेंढे, ओम बगाडे, खुशी मेंढे, आर्यन सहारे, मंथन मेंढे यांचे सहित परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे. विद्यार्थी व प्रवासीहिताची ही मागणी असून याकडे त्वरित लक्ष देऊन निर्णय देण्यात यावा अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी केली आहे.
————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here