



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.26एप्रिल):-कोळसाच्या तुटवडा जाणवत असल्याने तसेच विजेची मागणी वाढत असल्याने भारनियमन करण्यात आले आहे.यामधील सुटका करण्यासाठी अनेकजण इन्व्हर्टरचा वापर करीत आहेत.परंतु जेवढा जास्त इन्व्हर्टरचा वापर केले,तेवढेच वीजबिलसुध्दा वाढत असते.त्यामुळे इन्व्हर्टरच्या आवश्यक असेल तेवढाच वापर करणे निरंतर आहे.राज्यात विजेच्या तुरवडा भेडसावत असल्याने भारनियमन सुरू करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात पाच ते सहा तास तर, शहरी भागात दिड तास बत्ती गुल असते.उन्हाळ्यातील उकाड्याच्या त्रास सहन करावा लागतो, वाचविण्यासाठी अनेकांनी इन्व्हर्टरच्या वापर वाढविला आहे.मात्र जेवढे जास्त इन्व्हर्टर वापराल,तेवढेच जास्त वीजबिल, असे समीकरणे असते. वीजपुरवठा सुरसुळीत सुरू असेल तेव्हा इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज केली जाते.त्यासाठी लागणारी वीज आधीच बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते.वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर हिच वीज वापरण्यात येते.त्यामुळे वीजपुरवठा बंद असला तरीही वीजबिल वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे इन्व्हर्टरचा वापर जपून करणे गरजेचे आहे.





