Home महाराष्ट्र शहीद भगतसिंग नगर पालिका उमरखेड द्वारे क्षेत्रभेट सहल आयोजन

शहीद भगतसिंग नगर पालिका उमरखेड द्वारे क्षेत्रभेट सहल आयोजन

208

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26एप्रिल):-“गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाय बलिहारी गुरु जी ने गोविंद दियो बताए”।गुरु आणि परमेश्वर दोघे एकदाच समोर आल्यानंतर,मी प्रथम गुरूला वंदन करेल.कारण ते गुरूच आहेत ज्यांनी आपल्याला परम सत्याचा मार्ग शिकविलेला असतो.या संत कबीरांच्या दोह्याची पुनरावृत्ती करत शहीद भगतसिंग न. प. शाळा क्रं. 2 उमरखेड, शिक्षवृंद-विद्यार्थी यांनी राजे संभाजी नगर येथे क्षेत्र भेट, सहल विद्यार्थी-शिक्षक कार्यशाळेचे आयोजन केले होते.ज्यामध्ये इयत्ता पाचवी वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी संगीत, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम,झोका, तसेच वक्तृत्व, संभाषण, नृत्य आणि नाटक अशा विविध कलेतून आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना चालना दिली.

ज्यामध्ये गीत सादरीकरण कु. निकिता इंगोले, कु. दिव्या इंगोले, कु. वैभवी चव्हाण, अविराज आठवले,नागेश खुने,मेहेर वाणपत्रे, यांनी तर नृत्य सादरीकरणामध्ये कु.निकिता इंगोले, आशा मासोळकर, कु. पल्लवी लसकर, कु. रुद्राक्षी साबळे, राधिका कांबळे, साक्षी वाघमारे सहभाग दर्शविला.महामानवांच्या कथा, मनोरंजन कथा, कविता वाचन यांमधून या बालगोपालांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या मनमोहक कीलबीलाटात आणि अंगी दडलेल्या गुणांनी वातावरणामध्ये शितलता आणली.

शहीद भगतसिंग नगरपरिषद शाळा क्रं.2, च्या वतीने सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.यामध्ये गोपालकाला, कार्यशाळा, सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन, आनंद निर्मिती व जल्लोष निर्माण याउद्देशाने ही क्षेत्रभेट सहल वर्गशिक्षक, श्री. योगेश बुरफुले सर यांच्या नेतृत्वात आयोजीत करण्यात आली होती.

दप्तराच्या ओझ्या पासून दूर, निसर्गातील मनमोकळे, आल्हाददायी आणि वास्तववादी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या कल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.या क्षेत्रभेट कार्यक्रमात वर्गशिक्षक श्री.योगेश बुरफुले सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगून प्रेरित केले.तर श्री.राहुल कोरडे यांनी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करुन आपल्या परीक्षांमध्ये कसे यश संपादन करावे याबद्दल मार्गदर्शन केले.

सदर उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ. दि.दी. पोफाळकर मॅडम, यांच्या मार्गदर्शनात केले होते.क्षेत्रभेट,सहल यशस्वीतेसाठी श्री.राहुल कोरडे सर,श्री.गुलाब जाधव सर, सौ.वाढवे ताई, यांनी परिश्रम घेतले.तर सदर क्षेत्र भेटीसाठी श्री.चौधरी सर, श्री. सुर्यवंशी सर,श्री.राठोड सर, कु. म्हेसकर मॕडम यांनी सदिच्छा व्यक्त केल्यात.तर आगमना प्रसंगी राजे संभाजी नगर, उमरखेड मित्रमंडळाद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांना स्नेहाभोजना ची मेजवानी देऊन सदर क्षेत्रभेट,सहलीची सांगता करण्यात आली.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here