Home बीड बीड : कंटेनरच्या धडकेत बाईकवरील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

बीड : कंटेनरच्या धडकेत बाईकवरील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

206

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.26एप्रिल):-बाईकवरील दोन मित्रांचा कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील दशमी गव्हाण येथे सोमवारी सायंकाळी घडली. महेश छगन गायकवाड, जयदत्त अनिल जीवे अशी मृतांची नावे आहेत.

आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील महेश छगन गायकवाड (२१) पुणे येथे एका मेडिकल शॉपवर काम करतो. तर जयदत्त अनिल जीवे ( २३, रा.शिरापुर ) याचा गावात मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. सोमवारी महेशला पुण्याला जायचे होते. तर जयदत्त मंडप डेकोरेशनचे साहित्य आणण्यासाठी नगरला निघाला होता.

अहमदनगरपर्यंत सोबत जाऊ असे ठरल्याने महेश आणि जयदत्त दोघे एकाच बाईकवर सायंकाळी निघाले. दरम्यान, अहमदनगरवरून आष्टीकडे येणाऱ्या कंटेनरने अहमदनगर जिल्ह्यातील दशमी गव्हाण येथे समोरून जोराची धडक दिली. यार दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोन मित्रांच्या मृत्यूने कानडी व शिरापूर गावांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here