



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.25एप्रिल):-दोन दिवसापूर्वी गंगाखेड तालुक्यातील खळी येथील सोन्नर कुटुंबीयांचे घर आग लागल्याने जळून भस्मसात झाले.खळी येथील गावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर नगर याठिकाणी शेत वस्तीमध्ये सोन्नर कुटुंब राहत् होते,अगी मुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू कपडे, अन्नधान्य, इत्यादी साहित्य जळून खाक झाले .
अशा वेळी भोलारामजी कांकरिया ट्रस्ट गंगाखेड द्वारा संचालित माणुसकीची भिंत च्या माध्यमातून अन्न,धान्य,कपडे,भांडी, इत्यादी जीवन आवश्यक वस्तूची ची मदत करून पाटबळ देण्याचे काम या माध्यमा मार्फत करण्यात आले या वेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,व कांकरिया ट्रस्ट च्या सचिव मंजुताई दर्डा,पूजा दर्डा,सुजाता पेकाम,सिद्धार्थ दर्डा,अमर कारंडे,विद्या साखरे पाटील,आणी गरजू पीडित पांडुरंग सोन्नर बंधू उपस्थित होते.





