Home चंद्रपूर म.रा.पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीसपदी संजय चिडे तर कार्याध्यक्षपदी गंगाधर बोढे यांची...

म.रा.पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीसपदी संजय चिडे तर कार्याध्यक्षपदी गंगाधर बोढे यांची निवड

318

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25एप्रिल):-महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूरच्या भद्रावती येथील त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनापूर्वी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत समितीचे सरचिटणीस पदी संजय चिडे तर जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून गंगाधर बोढे यांची एकमताने निवड करण्यात आली . चंद्रपूर जिल्ह्यातील १५ ही तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार यांच्यासह जिल्हासरचिटणीस म्हणून संजय चिडे , जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून गंगाधर बोढे , जिल्हाकोष्याध्यक्ष सुनील कोहपरे , जिल्हानेता नारायण कांबळे , जिल्हासल्लागार दीपक वऱ्हेकर यांची एकमताने निवड करण्यात आली .

पुरोगामी समितीच्या लोकशाही कार्यपद्धतीत स्त्री पुरुष समानता असल्याने समांतर महिला मंच अग्रस्थानी हक्कासाठी लढा देत असते . महिला मंचाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून विद्या खटी , जिल्हासरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे , जिल्हाकार्याध्यक्ष सिंधू गोवर्धन , जिल्हाकोष्याध्यक्ष लता मडावी , जिल्हानेता सुनीता इटनकर , प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली .

नियामक आढावा सभेचे निरीक्षक म्हणून राज्यसरचिटणीस हरीश ससनकर , राज्य महिला अध्यक्ष अल्का ठाकरे तर मार्गदर्शक म्हणून राज्यनेते विजय भोगेकर उपस्थित होते . नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व १५ ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Previous articleवीज टंचाईच्या विरोधात भाजपा चंद्रपुर महानगर उतरली रस्त्यावर- शासनाला दाखवला कंदील
Next articlePM kisan Yojna : शुभ मुहूर्तावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता! राज्य शासनाकडून याद्यांची पूर्तता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here