Home बीड केज-बीड मार्गावर तहसीलदाराची गाडी आणि मोटारसायकलचा अपघात; एक जखमी

केज-बीड मार्गावर तहसीलदाराची गाडी आणि मोटारसायकलचा अपघात; एक जखमी

250

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.24एप्रिल):-केज-बीड महामार्गावर अंबाजोगाईच्या तहसीलदारांची शासकीय गाडी आणि एका मोटारसायकलची धडक होऊन मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला अंबाजोगाई येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी की, दि. २३ एप्रिल शनिवार रोजी अंबाजोगाईचे नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड हे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयातील बैठक आटोपून अंबाजोगाईकडे जात असताना सायंकाळी ६:३० वा. केज-बीड महामार्ग क्र. (५४८-डी) पद्मश्री विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखान्याजवळ सरकारी वाहन क्र. (एम एच-२३/एफ-१५१५) आणि केजकडून मूकबधिर विद्यालयाच्या दिशेने जात असलेले कर्मचारी परशुराम सिरसाट रा. आष्टी ह. मु. फुले नगर केज यांची मोटार सायकल क्र. (एम एच-४४/ए ए-३३५४) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात परशुराम सिरसाट हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविले आहे. दरम्यान या अपघातात नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड आणि सरकारी गाडीचे वाहन चालक अंबुरे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच केज येथील नायब तहसीलदार सचिन देशपांडे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना मदत केली.

पोलीस नाईक शिवाजी कागदे यांची कर्तव्य तत्परता

आपले कर्तव्य संपवून या रस्त्याने गावाकडे जात असलेले पोलीस नाईक कागदे यांनी अपघात पाहताच त्यांनी तात्काळ पोलीस सहाय्यक निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला. त्या नंतर पोलीस नाईक धनपाल लोखंडे, महादेव बहिरवाळ आणि हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here