Home महाराष्ट्र पेण येथे प्रथमच संपन्न होणार “रोजगार हक्क परिषद

पेण येथे प्रथमच संपन्न होणार “रोजगार हक्क परिषद

277

✒️रायगड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

रायगड(दि.24एप्रिल):- मधिल पेण तालुक्यांत मुलभूत अधिकार संघर्ष समिती, म.गांधी वाचनालय पेण, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रोजगार हक्क परिषदेचे आयोजन मंगळवारी दि.२६/०४/२०२२ रोजी सका. ८.३० ते सायं. ४.०० पर्यन्त आगरी मंच हॉल चिचपाडा, पेण येथे करण्यात आले आहे.

दरवर्षी लाखो तरूण एमपीएससी, यूपीएससी, डिप्लोमा, डिग्री इंजिनीयर्स, शिक्षक, आयटीआय इ. चे शिक्षण पूर्ण करतात. परंतु यांच्या साठीच्या अवश्यक असणाऱ्या लाखो रोजगारांची उपलब्धता करुन देण्यात शासन अपयशी ठरत आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या दिवसें-दिवस प्रचंड वाढत चालली आहे. बेरोजगारांना त्यांचे हक्क समजुन देण्यासाठी व रोजगार हक्काचा कायदा करून, रोजगार हक्काचा समावेश मूलभूत अधिकारांत करावा या प्रमुख मागणी सह बेरोजगारांना त्यांच्या गुणवत्ते नुसार तातडीने रोजगार द्यावा, रोजगार देता येत नसेल तर, वाढती महागाई लक्षांत घेवून बेरोजगारांना सन्मानाने जगता यावे यासाठी किमान दहा हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा. शेतीमध्ये सर्वात जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतीमध्ये रोजगार निर्माण केला तर नोकऱ्यांवरील ताण मोठ्या प्रमाणांत कमी होवू शकेल हे लक्षांत घेवून कृषी क्षेत्राला सर्व त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देवून शेतीमध्ये मोठी रोजगार निर्मिती करावी.

कोविडमुळे ज्या कुटूंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशा कुटंबातील एका व्यक्तीला कायम स्वरूपी नोकरी द्यावी, अशा व इत्तर मागण्यांचे ठराव या रोजगार हक्क परिषदेत घेता यावे यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये चार सत्र असणार आहेत.पहिल्या सत्रामध्ये “रोजगार अधिकार मुलभूत अधिकार” या विषयावर प्रा. किशोर ठेकदत्त मुंबई, ॲड.सुरेश माने मुंबई, अरविंद वैद्य पुणे यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून रत्नाकर महाजन पुणे हे या सत्राच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यांच्यासोबत मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक कोरडे. रोजगार हक्क परिषदेचे अध्यक्ष अॅड. आकाश का.म्हात्रे. माजी सरकारी वकिल अॅड. विठ्ठल गावंड, पत्रकार प्रतिनिधी प्रकाश माळी हे मंचावर उपस्थित असणार आहेत.
दुसऱ्या सत्रामध्ये “शासकीय धोरण आणि बेरोजगारी” या विषयावर प्रा. मृदुला निळे मुंबई विद्यापीठ, भूषण सामंत कामगार नेते मुंबई, पंकज पासवान, महेश सामंत- देश की बात फाऊंडेशन व या सत्राचे अध्यक्ष डॉ. आनंद करंदीकर व्यवस्थापन तज्ज्ञ पुणे असणार आहेत. यांच्या समवेत सामजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, डि.पी.डी.सी. सदस्य प्रसाद पाटील, पत्रकार विजय मोकल हे उपस्थित असणार आहेत.

तिसऱ्या सत्रात “ग्रामीण भारत आणि बरोजगारी” या विषयावर प्रा. डॉ. सुरेंद्र मोरे धुळे, प्रा. घनश्याम दरणे-यवतमाळ, हिरालाल पगडाल-संगमनेर, प्रशांत खंदारे, पुसद व या सत्राच्या अध्यक्षस्थानी विश्वास उटगी ठाणे हे असणार आहेत. यांच्या सोबत मंचावर शिवनिर्णय वृत्तपत्राच्या संपादिका सौ. रेखा जाधव, डॉ. सिद्धार्थ पाटील. व गांधिमंदिरचे प्रमुख अण्णा वनगे हे सहभागी होणार आहेत.या रोजगार हक्क परिषदेचे चौथे सत्र हे खुले सत्र असून या सत्रात मंचावर मू.अ.सं.संघटना प्रतिनिधी व मान्यवर विवेक कोरडे, अॅड. आकाश म्हात्रे, संतोष ठाकूर, दिलीप पाटील-सेझविरोधी संघर्ष समिती. सामाजिक कार्यकर्ते आस्वाद पाटील-अलिबाग,मिलिद रा.म्हात्रे-रोहा. पनवेल, नागपूर, चंदपूर येथून आलेले प्रतिनिधी. इत्यादी मान्यवर असणार आहेत. या सत्रा मध्ये ठराव आणि रोजगार हक्क संघर्षाची पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. या सत्रात प्रमुख चार विषयांच्या ठरावांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून इत्तर ही योग्य ठराव या रोजगार हक्क परिषदेत घेतले जाणार आहेत. या रोजगार हक्क परिषदेसाठी प्रवेश निशुल्क असून सहभागी सदस्यांची चहापाणी, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मूलभूत अधिकार संघर्ष समिती मार्फत करण्यात येणार आहे.

रोजगार हक्क परिषद यशस्वी होण्यासाठी मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे राजेंद्र म्हात्रे, अशोक मोकल, संतोष ठाकूर, नंदाताई म्हात्रे, नरेश मोकल सर , राजन झेमसे, संदिप पाटील, हेमंत पाटील, रुपेश पाटील इत्यादी कार्यकर्ते खुप मेहनत घेत आहेत.बेरोजगारांसाठी घेण्यात येत असलेल्या या रोजगार हक्क परिषदेत नावनोंदणी करून जास्तित-जास्त बेरोजगारांनी सहभागी होण्याचे आवाहन मूलभूत अधिकार संघर्ष समिती मार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रमपूर्व नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी ९८२२३०७७२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही रोजगार हक्क परिषदेस उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना, मूलभूत अधिकार संघर्ष समिती – पेन युनिट मार्फत, दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here