Home महाराष्ट्र सोमवारी सतेज महोत्सवाचे आयोजन

सोमवारी सतेज महोत्सवाचे आयोजन

238

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.24एप्रिल):-प्रागतिक लेखक संघ, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व निर्मिती फिल्म कल्ब यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेब यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सतेज महोत्सवाचे आयोजन सोमवार दि. २५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २: वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. निमित्त वाढदिवसाचे… प्रबोधन जनतेचे! या अभिनयानार्तंगत मा. सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसोा यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त… आयोजित सतेज महोत्सवामध्ये कवी संमेलन, कोरोना योध्दा पुरस्कार वितरण समारंभ, निर्मिती फिल्म कल्ब निर्मित प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम या मराठी प्रेम गीतांचा संगीतमय कार्यक्रम तसेच मा. सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसोा यांचा ग्रंथतुला, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि कोल्हापूरी फेटा देऊन जाहीर सत्कार समारंभ आयेजित करण्यात आला आहे. त्याच बरोबर यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेब यांचा सत्कार इतर मान्यवरांना पुस्तक, वही व पेन देऊनच करण्यास परवानगी असणार आहे.

यावेळी आयोजित कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी डॉ. सतीशकुमार पाटील हे असणार आहेत तर निमंत्रित कवी म्हणून प्रा. वसंत भागवत, प्रा. शोभा चाळके, रंजना सानप, डॉ. स्मिता गिरी, रघुनाथ कापसे, सतीश घुगरे, साताप्पा सुतार, प्रकाश शिंदे, डॉ. दयानंद काळे, उध्दव पाटील, प्रताप घेवडे यांच्या सह ५० हुन अधिक कवी सहभागी होणार आहेत. यावेळी नवकवींना कविता सादर करता येणार असून सहभागी कवींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.यावेळी निर्मिती फिल्म कल्ब निर्मित प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम या मराठी प्रेम गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयेजित केला असून यामध्ये धनश्री नाझरे, अमृता नलवडे, चंद्रनील सावंत, आदित्य बल्लाळ, अनुष्का माने, आरती काशीद, प्रांजल कामत, अमोलकुमार बांगर, राहूल कांबळे, संकेत भोसले, माऊली गावडे, श्रेयस कांबळे, वैभव काळे, सृष्टी देसाई, विश्ववेधा सावंत आदि कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

कोरोना योध्दा पुरस्कार वितरण समारंभामध्ये कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी मानून कार्य करणार्‍या महाराष्ट्रातील ३०० हुन अधिक व्यक्तींचा राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.सतेज महोत्सवात आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव यांच्यासह अ‍ॅड. प्रकाश मोरे, विश्वास सुतार, माजी आमदार राजीव आवळे, भरत लाटकर, अ‍ॅड. विवेक घाटगे, गौरी मुसळे, मकरंद बुरांडे, मोहन सातपुते आदि मान्यवर उपस्थित रहाणार असून या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हमाने हे असणार आहेत.

सदर सतेज महोत्सवात निमंत्रक सुरेश केसरकर, प्रा. शोभा चाळके, अ‍ॅड. करुणा विमल, अच्युतराव माने, नरेंद्र रहाटे, मुकुंद कोकणे, देवराव कोंडेकर, डॉ. दयानंद ठाणेकर, चंद्रकांत सावंत, महादेव चक्के, केरबा डावरे, भगवान माने, शिवाजी चौगुले, संभाजी थोरात, तात्यासो भोसले, दिलीप घोलप हे आहेत.या पत्रकार परिषदेस सुरेश केसरकर, अ‍ॅड. करुणा विमल, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासणे, चंद्रकांत सावंत उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here