Home बीड गेवराई : ऊसतोड मजुरांवर हल्ला; चौघांविरूध्द ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

गेवराई : ऊसतोड मजुरांवर हल्ला; चौघांविरूध्द ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

270

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.24एप्रिल):-उसाच्या फडात तोडणी सुरू असताना त्या ठिकाणी येऊन चौघांनी किरकोळ कारणावरून दोन महिलांसह तीन पुरुषांवर हल्ला केल्याची घटना राहेरी येथे घडली. यावेळी एकाच्या डोक्यावर कोयता मारला. या मारहाणीत ५ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांविरूध्द मारहाणीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. गेवराई तालुक्यातील तलवाडा पासून जवळ असलेल्या राहेरी शिवारात ऊस तोडणीचे काम सुरू होते. त्याठिकाणी आलेल्या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. ऊस तोडणीसाठी कामाला कसा आलास असे म्हणून त्यांनी संभाजी रंधे व शारदा यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

त्यावेळी ज्ञानेश्वर बालासाहेब रंधे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. यावेळी महादेव लाड याने कोयत्याने मारून ज्ञानेश्वर रंधे यांना जखमी केले. त्याचवेळी ज्ञानेश्वर यांची पत्नी विद्या व त्यांचे चुलते प्रभाकर आसाराम रंधे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी ज्ञानेश्वर रंधे यांच्या फिर्यादीवरून महादेव भिमराव लाड, ज्ञानेश्वर निरंतर लाड, अशोक निरंतर लाड, गणेश भिमराव लाड (सर्व रा. राहेरी) यांच्याविरूध्द तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी डीवायएसपी स्वप्नील राठोड, तलवाड्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here