



✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.23एप्रिल):-ग्रामगीता महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षाला शिकत असलेल्या कँसर ने पिडीत विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या विध्यार्थी कल्याण समिती ने आर्थिक मदत करून आजारातून मुक्त होण्यासाठी सदिच्छा दिल्या.तालुक्यातील गोंदोडा येथील कु.आरती जयराम वसाके ही विद्यार्थीनी कला शाखेत पदवी अभ्यासक्रम करीत असून ती पहिल्या वर्ष्यात शिकत आहे.मात्र मागील काही दिवसात तिला कर्करोग आजाराने ग्रासले आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या योगदानातुन एकवीस हजार रुपये निधी गोळा करून पीडित विद्यर्थीनीला मदत देण्यात आली.
महाविद्यालयात विध्यार्थी कल्याण समिती कार्यरत असून आर्थिक मागास व गरजू विध्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्य करीत आहे. ज्यामध्ये प्रवेश फी,बसेसची पास फी,आदी ची मदत केली जाते.सदर विध्यार्थिनीला सहकार्य म्हणून ही राशी देऊन तिला आजारातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डॉ अमीर धमानी,विध्यार्थी कल्याण समिती संमनवक प्रा.समीर भेलावे,प्रा.हुमेशवर आनंदे,डॉ संदीप सातव,प्रा विवेक माणिक,डॉ युवराज बोधे,आदी उपस्थित होते.


