Home बीड ट्रक-जीपचा भीषण अपघात; सहा प्रवासी जागीच ठार

ट्रक-जीपचा भीषण अपघात; सहा प्रवासी जागीच ठार

91

🔸अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव परिसरातील घटना

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.23एप्रिल):-भरधाव वेगात असलेल्या ट्रक व जीपच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत.हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ आज (दि.२३) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्वी (ता.लातूर) येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने (क्र. एम.एच.२४ व्ही ८०६१) जात होते.सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्र.आर.जे. ११ जी.ए.९२१०) जोराची धडक दिली.यात पाच महिला व एक बालक जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह व जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here