Home महाराष्ट्र उसगाव या सेवा सहकारी संस्थेत बिनविरोध निवडून आले

उसगाव या सेवा सहकारी संस्थेत बिनविरोध निवडून आले

158

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.२३एप्रिल):-शुक्रवार रोजी सेवा सहकारी संस्था उसगाव रा. उसगाव येथे आज १७६६ ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत प्रेमानंद जोगी, सुधाकर चिकनकर, केशव काळे, अजय जोगी, बबन सावे, जितेंद्र बांदूरकर, रमेश काळे, शालिक झाडे, रूपचंद कवडे, राजेंद्र बोडखे, रामदास ठावरी, सुनीता ठाकरे, पंचफुला ठाकरे हे निवडून आलेले उमेदवार बिनविरोध निवडून आले.

त्यानिमित्त उसगाव येथे स्वागत समारंभ पार पडला. स्वागत समारंभात मा. कृषीबाजार समिती, चंद्रपूरचे दिनेश चोखारे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी सभापती रोशन पचारे, पवनकुमार आगदरी, शामराव पाटील जोगी, दिलीप ठाकरे, पांडुरंग वासेकर, नरेंद्र बुच्छे, पुरुषोत्तम राजूरकर, प्रशांत सरोकार, रोशन सावे, हेमराज भावणे, चेतन (बंटी) घोरपडे, सुधाकर जुनारकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here