Home महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी शाळेची माजी विद्यार्थिनी प्रा.पल्लवी सपकाळे यांना पी.एच.डी पदवी प्रदान

सुवर्ण महोत्सवी शाळेची माजी विद्यार्थिनी प्रा.पल्लवी सपकाळे यांना पी.एच.डी पदवी प्रदान

213

🔹आमचे विद्यार्थी आमचा अभिमान – मुख्या. जे.एस.पवार

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.23एप्रिल):; येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची माजी विद्यार्थिनी पल्लवी वसंत सपकाळे यांना नुकतीच पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाशी संलग्न रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नेरुळ नवी मुंबईच्या प्राध्यापिका पल्लवी वसंत सपकाळे यांना इलेक्ट्रॉनिक्स ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी मध्ये मुंबई विद्यापीठातून ” Enhancing Quality of Service in Mobility Management for next Generation Network ” स्पेशलायझेशन विषयातून पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

मार्गदर्शक म्हणून डॉ.उत्तम कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.माझ्या यशामागे माझी आई सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगावच्या माजी शिक्षिका सौ.संघमित्रा वसंत सपकाळे, वडील सेवानिवृत्त जि.प.शिक्षक वसंत सपकाळे, आणि पती प्रशांत रमेश कांबळे बायोमेडिकल शिलर कंपनी मुंबई येथे मॅनेजर यांचे अनमोल सहकार्य लाभले. माझ्या महात्मा फुले हायस्कूल शाळेने माझ्यावर केलेले संस्कार आणि माझ्या शिक्षकांनी दिलेले शिक्षण यामुळेच मी पदवी संपादन करू शकली असे प्रतिपादन डॉ.पल्लवी सपकाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here