



🔸राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले आणि महाराष्ट्रातील संबंध ब्राम्हण समाज पेटून उठला
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.23एप्रिल):-राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले आणि महाराष्ट्रातील संबंध ब्राम्हण समाज पेटून उठला. समाजाच्या भावना दुखावल्या मुळे अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी बीड येथील ब्राम्हण समाजाच्या लोकानी रस्त्यावर उतरून रॅली काढली.
तसेच अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीने जोर धरला आहे. परळी येथील पोलीस स्टेशन मध्ये अमोल मिटकरी यांच्याविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाती तोवर ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. यावेळी अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व नारे लागवण्यात आले.


