Home बीड “माझ्या नवऱ्याला फोन का करतेस”, म्हणत महिलेकडून नर्सला ऊसाने मारहाण

“माझ्या नवऱ्याला फोन का करतेस”, म्हणत महिलेकडून नर्सला ऊसाने मारहाण

273

🔺बीडमधील धक्कादायक प्रकार

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.22एप्रिल):-माझ्या नवऱ्याला फोन का करतेस, तुझा नंबर दे ” असे म्हणत बीडमधील खासगी रूग्णालयातील एका 30 वर्षीय नर्सला, एका महिलेने ऊसाने मारहाण केली आहे. ही घटना बीड शहरातील जिजामाता चौकात असणाऱ्या, एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी सदर नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून, शारदा बाळू कुलथे या विवाहित महिलेविरोधात, बीड शहर ठाण्यात कलम 223, 504, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चक्क हॉस्पिटलमध्ये ऊसाने मारहाणीची घटना घडल्याने बीड शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाळवंडी नाका परिसरात वास्तव्यास असलेली एक 30 वर्षीय नर्स, शहरातील जिजामाता चौकातील एका खासगी रूग्णालयात काम करते.

यादरम्यान आरोपी माहिला सदर रूग्णालयात आली व म्हणाली, येथे आमुक आमुक नर्स कोण आहे? याची विचारणा करून आरोपी महिला त्या नर्सजवळ गेली. ” तु माझ्या नवऱ्याला फोन का करतेस , तुझा नंबर मला दे , असे आरोपी महिलेने म्हटले, त्यावर मी तुम्हाला नंबर देणार नाही, असे त्या नर्सने यावेळी सांगितले . या सगळ्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी महिलेने त्या नर्सला, हातातील ऊसाने मारहाण करण्यास सुरूवात केली. घडलेल्या या घटनेमुळे सदर रूग्णालयात काही तास तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी सदर नर्सने बीड शहर ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here