Home चंद्रपूर महिला काँग्रेस ने आयोजित केली मुस्लिम भगिनींसाठी इफ्तार पार्टी

महिला काँग्रेस ने आयोजित केली मुस्लिम भगिनींसाठी इफ्तार पार्टी

208

🔹कार्यक्रमातून दिला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22एप्रिल):-महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून तसेच रहेमत नगर मधील प्रतिष्ठित नागरिक हाजी सहाब मोहंमद हारून यांच्या सहकार्याने रहेमत नगर मध्ये मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

पुरुषांसाठी बरेच लोक इफ्तार ठेवतात पण महिलांसाठी कोणी ठेवत नाही म्हणून महिला काँग्रेस ने पुढाकार घेऊन ही इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी बहुसंख्य मुस्लिम भगिनींनी इफ्तार करून कार्यक्रमातच नमाज अदा केली. यावेळी रमजान या पवित्र महिन्याचे महत्व समिस्ता फारुकी यांनी हिंदु भगिनींना समजावून सांगितले.

सध्या देशामध्ये ध्रुवीकरण करणाऱ्या शक्ती वाढत आहे हिंदू मुस्लिमां मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून सामान्य व्यक्तीला मुख्य मुद्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली समता प्रत्येक सुजान नागरिकाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा कार्यक्रमातुन समाजात सौहार्द प्रस्थापित होण्यास मदत होऊ शकते असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी या इफ्तार कार्यक्रमात व्यक्त केले.

या इफ्तार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फौंडेशन काँग्रेस च्या शहर अध्यक्षा शितल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, उपाध्यक्षा महेक सय्यद, नेहा मेश्राम, समिस्ता फारुकी, निगार शेख, शिरीन कूरेशी,वाणी डाराला, वैशाली जोशी,मंगला शिवरकर, उषा कामतवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात रहेमत नगर मधील बहुसंख्य मुस्लिम महिलांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here