Home महाराष्ट्र 17 मे रोजी ओबीसी समाजाचा आझाद मैदानावर एल्गार… रमेश आप्पा बारसकर

17 मे रोजी ओबीसी समाजाचा आझाद मैदानावर एल्गार… रमेश आप्पा बारसकर

412

✒️विशेष प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कोल्हापूर(दि 22एप्रिल):-ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी, घटनेतील ३४० व्या कलमाची अंमलबजावणी करावी, भटक्या विमुक्त जमातींना आदिवासी प्रवाहात समाविष्ट करावे, आरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक त्वरित पूर्ण करावे, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी येत्या १७ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे.अशी माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश बारसकर यांनी आज (ता. 22 एप्रिल) येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्योती क्रांती परिषदेची वतीने कोल्हापूर येथील प्रेसक्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बारसकर यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत ओबीसी समाजासाठी ३४० कलमामध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे. पण, स्वातंत्र्यानंतर या कलमाची अंमलबजावणी झालेली नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. पुढे शैक्षणिक व नोकरीतील जाईल,अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आरक्षण मिळवण्यासाठी आता नेत्यांच्या मागे न जाता, जनतेला सोबत घेऊन आरक्षणाची लढाई लढावी लागणार आहे. राजकारणात डोक्यांना नाही तर संख्येला किंमत आहे, त्यामुळे ओबीसी समाजाला सोबत घेऊन आरक्षणाचा लढ्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचेही बारसकर यांनी जाहीर केले. देशात जनावरांची जनगणना केली जाते परंतु बहुसंख्य असलेल्या ओबीसींची जनगणना होत नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च एकतर्फी केला जात आहे.आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजातील सुमारे 56 हजार लोकप्रतिनिधी वंचित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेसाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष देसाई संघटनेचे प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर,संघटक जितेंद्र अष्टुळ,प्रा प्रकाश सोनवणे,सत्तार शेख,कोल्हापूरचे ज्योती क्रांती परिषदेचे उपाध्यक्ष अजित पाडळीकर,सागर सावंत,सुरज कांबळे,एकनाथ कांबळे,प्रमोद मांगले,अविनाश देवाळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here