Home गडचिरोली २४ एप्रिल रोजी गडचिरोलीत भव्य रक्तदान शिबीर

२४ एप्रिल रोजी गडचिरोलीत भव्य रक्तदान शिबीर

206

🔸औचित्य- निरंकारी विश्वाचा मानव एकता दिन: शासकीय महिला रूग्णालयात शिबिराचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.२२एप्रिल):-(दै.पुरोगामी संदेश) येत्या २४ एप्रिल रोजी गडचिरोली येथे संत निरंकारी ब्रँचच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित शासकीय महिला रूग्णालयात हे शिबीर राहणार आहे. जिल्हाभरातील रक्तदात्यांनी बहुसंख्येने उत्स्फुर्त सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन निरंकारी मंडळाने केले आहे.गडचिरोली येथील संत निरंकारी ब्रँचच्या वतीने येत्या रविवारी दि.२४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ एप्रिल हा दिवस निरंकारी विश्वाचा मानव एकता दिन म्हणून सर्वश्रुत आहे. मानव एकता दिनाच्या औचित्याने जगभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन होत असते.

या शिबिरांद्वारे रक्तसंकलन करून देणारे जगातील अव्वल क्रमांकाचे संत निरंकारी आध्यात्मिक मिशन म्हणूनही हे मिशन ओळखले जाते. “रक्त नालियों में नही, नाडियों में बहना चाहिए!” या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वचनाला प्रत्यक्षात उतरविण्याच्या हेतूने रक्तदान होत असते. यंदा आपल्या भारत देशात आयोजित रक्तदान शिबिरांच्या शृंखलेत २६५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली असल्याचे कळविण्यात आले आहे. यात गडचिरोली ब्रँचचाही समावेश आहे.

“मानव एकता दिनाच्या औचित्याने संत निरंकारी मंडळ दिल्ली जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने दि.२४ एप्रिल २०२२ रोज रविवारला सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वा. दरम्यान शासकीय महिला रूग्णालय गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले आहे. तरी जास्तीत जास्त संत निरंकारी मंडळाचे अनुयायी, भाविक, भक्त, ईश्वरप्रेमी, इच्छुक रक्तदाते, संत निरंकारी सेवादलातील बंधुभगिनी सर्वांनी या विशाल रक्तदान यज्ञात कृतियुक्त सहभाग घ्यावा आणि विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या कृपेस व आशीर्वादास पात्र ठरावे.” असे आवाहन वडसा झोनचे झोनल इंचार्ज किशनजी नागदेवे, गडचिरोली क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक हरीशजी निरंकारी, गडचिरोली ब्रँचमुखी गजाननराव तुनकलवार, गडचिरोली ब्रँचचे सेवादल संचालक राजेशजी गुंडेवार, गडचिरोली ब्रँचचे सेवादल शिक्षक वसंतजी मेडेवार आदींनी केले आहे. पुरोगामी संदेश न्युज पोर्टलला ही माहिती मंडळाचे मराठी साहित्यिक श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here