Home चंद्रपूर आक्रोश…गरिबांचा…

आक्रोश…गरिबांचा…

230

पेट्रोलियम पदार्थांचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे महागाई झाली.यात होरपळून जातो आहे तो सर्वसामान्य माणूस. पेट्रोलियम पदार्थ केंद्राच्या अखत्यारीत. तरीही आक्रोश आंदोलन होते राज्य सरकारच्या विरोधात.सामान्यांची दिशाभूल कशी केली जाऊ शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे भाजप.

पेट्रोल,डिझेल हेच मुळात महागाई वाढविणारे घटक.पेट्रोल ,डिझेल वाढले तर दळणवळण महागते आणि त्याचा परिणाम भाजीपाला ते जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर होतो.हे आंदोलन करणाऱ्या भाजपला माहीत आहे.आणि म्हणूनच 2014 पूर्वी 60 रुपये पेट्रोल असतानाही संपूर्ण देशात आंदोलन उभारणारे आजचे सत्ताधारीच होते.पण आज जेव्हा 120 रुपये पेक्षा जास्त पेट्रोल झाले तरीही त्याचे समर्थन करण्याचे डावपेच त्यांनाच अवगत आहेत. या संदर्भात माझ्या भाजप मधील एका मित्राचे फेसबुकवर आलेले उत्तर मजेशीर आहे. पदाधिकारी असलेल्या या मित्राने एकाला उत्तर देताना जे म्हटले ते भक्ती किती आंधळी असते याच मसालेदार उदाहरण आहे.@पेट्रोल भारतात तयार होत नाही म्हणून महाग आहे,भोंगे भारतात तयार होतात,ते लावायला काय हरकत आहे#.म्हणजे 2014 पूर्वी पेट्रोल भारतात तयार होत होते का?तेव्हा भाजपने जे आंदोलन उभारले ते भारतात तयार होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांचे भाववाढ होते असे म्हणायचे का?…

भक्ती मध्ये माणसाचे किती अधःपतन होते हे यातून स्पष्ट व्हावे.
दरवाढीचे समर्थन करताना काही जण तर सरकारी कर्मचारी यांचे वाढणारे महागाई भत्ता याचे उदाहरण देतात.देशातील सारेच नोकरी करतात का?सर्वसामान्य माणूस गाड्या वापरत नाहीत का?असे प्रश्न विचारले की ते विकासाकडे बोट दाखवितात. बर विकास कोणता झालं असे विचारले तर बुलेट ट्रेन चे उदाहरण देतात.बुलेट ट्रेन ही काय गरिबांसाठी आहे?

म्हणजे सर्वत्र गरीब पिंजून जात असतानाही त्यांच्या रोजीरोटी साठी कुणीच ओरडत नाहीत. केवळ सत्ता प्राप्त कशी करता येईल एवढाच उद्देश ठेऊन आक्रोश आंदोलने केली जात आहेत. केंद्र सरकार जोपर्यंत इंधन तेलावरील केंद्रीय कर कमी करत नाही तोपर्यंत राज्य सरकारवर दबाव येईल आणि मगच थोडीशी महागाई आटोक्यात येईल,हे देशातील अर्थतज्ज्ञ सांगत आहेत.याकडे कानाडोळा करून गरिबांच्या नावाने आक्रोश आंदोलन करणे म्हणजे गोरगरिबांची थट्टा करणे आहे,हे आंदोलन कर्त्यांना चांगले ठाऊक आहे. मात्र जनता धर्माच्या गोळीमुळे गलीतमात्र झाला असल्याने त्याचा मनसोक्त आनंद लुटायला हे सर्व तय्यार आहेत.

अर्थात आक्रोश आंदोलन करणारे पुर्णतः चूक नाहीत.ते जनतेच्या अगतिकतेचा फायदा घेण्यास का सरसावू शकतात?कारण काँग्रेस गलीतमात्र झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात तर काँग्रेसला भरपूर स्पेस असतानाही कार्यकर्ते दिसत नाहीत.जे आहेत ते ठेकेदारी करण्यात नेत्यांच्या मागेमागे आहेत.सामान्य माणसाचा आवाज होण्याची धमक नसल्याने गरीब जनता चुपचाप मूग गिळून बसली आहे. गरिबांचे आक्रोश आंदोलन असते मात्र त्यात एकही गरीब दिसत नाहीत. यावरून गरिबांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे पण ती देण्यात काँग्रेस कमी पडत असल्याने कोणता झेंडा हाती घेऊ,अशा द्विधामनःस्थितीत गरीब आणि सामान्य माणूस सापडला आहे. त्याला पर्याय दिसत नसल्याने मग तो धर्माच्या गोळीला गिळून निपचित पडत आहे.त्यामुळे काँग्रेसने आता तरी कात टाकून सामान्य माणसाच्या मनात नवी आशा निर्माण करणे आवश्यक झाले आहे.नाहीतर आक्रोश त्याचा असला तरी तो त्याचा घटक कधीच नसेल,कुठेतरी शांतपणे अन्याय सहन करत महागाईच्या ओझ्याखाली दाबला जाईल.

✒️अरविंद खोब्रागडे(चंद्रपूर)मो:-9850676782

Previous articleसावरगाव (गोरे) येथे वंचित बहुजन आघाडी चे शाखा फलक उद्घाटन!*
Next articleमाळी समाज भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक मेळावा: माळी सेवा संघ व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here