



पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे या गावी वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.21एप्रिल):-वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्येक गाव खेड्या मध्ये जाऊन आपल्या पक्षाची धुरा देण्यात यावी म्हणून प्रामुख्याने गाव खेड्यामध्ये शाखा निर्माण करून वंचित बहुजन आघाडीला मजबूत करण्याचे आवाहन केले होते,यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून, पुसद, बाभूळगाव पांढरकवडा ,उमरखेड,p झरीजामणी,राळेगाव ,केळापूर, इत्यादी तालुक्यांमध्ये आदिवासी समाज प्रामुख्याने आढळतो, भारिप बहुजन,महासंघाच्यावतीने, किनवट तालुक्यातील भीमराव केराम यांना प्रथम आमदार केले होते. तोच पॅटर्नराबवून आदिवासीबहुल भगामध्ये वंचित बहुजन आघाडी ला मजबूत करण्याचे उद्दिष्ट पक्षाच्यावतीने ठेवले आहे त्याच दृष्टिकोनातून ते आव्हान स्वीकारून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी गावखेड्यात शाखा उघडण्याचा सपाटा सुरू केला असून त्याच अनुषंगाने काल पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथे वंचित बहुजन आघाडीचे शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
सध्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे काम तळा गळातील वंचित घटकातील लोकांना जागृत करणे व वंचितांना पक्षाच्या माध्यमातून सत्तेत जाण्याचा मार्ग दाखवून त्यांना सत्तेत कशा पद्धतीने जाता येईल हे उद्दिष्ट डोळ्या समोर ठेवून गावागावात खेड्यापाड्यात पक्ष फलक लावण्याचा ध्येय डोळ्यासमोर ठेवत आज अध्यक्षांनी फलकाच्या अनावरणाच्या वेळी पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले .
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव तालुका उपाध्यक्ष प्रकाश खिल्लारे तालुका प्रवक्ता उद्धव कराळे तालुका सोशल मीडिया प्रमुख रवी चौरे आदिवासी सामाजिक कार्यकर्ता दिपक तायवाडे ,शाखा अध्यक्ष – प्रकाश भरकाडे ,उपाध्यक्ष – महेश गोरेबउपाध्यक्ष – देवानंद डोगरे,कार्याध्यक्ष – अमोल धुळे ,शाखा संघटक – सुनिल डोंगरे या कार्यक्रमाचे,सुत्र संचालन – प्रशांत कांबळे तर प्रदर्शन – स्वप्नील गोरे यांनी केले. या कार्यक्रमाला
शाखेतील पदाधिकारी, माजी सरपंच विजय भोने , काशिराम किरोले,शिवाजी ढोके, परसराम भरकडे, सुधाकर कांबळे, पंकज पडघणे, गंगाराम धुळधुळे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


