



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.21एप्रिल):-जिल्हा परिषदेच्या सदस्य कथा बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी बीडमध्ये पसरतात जिल्हा रुग्णालयात क्षीरसागर समर्थक आणि कुटुंबीयांचे एकच गर्दी झाली होती बहिरवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रेखाताई क्षीरसागर यांना सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.स्वतः आ संदिप क्षीरसागर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टर मंडळींनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
रेखाताई क्षीरसागर यांनी राजुरी ग्रामपंचायत च्या सरपंच म्हणून काम केलेले आहे.काही महिन्यांपूर्वी त्या कोरोनामुळे औरंगाबाद येथे दाखल झाल्या होत्या.त्यावेळी कोरोनाला हरवून त्या बीडला आल्या होत्या.त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. बुधवारी सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने त्या घरातच पडल्या.आ संदिप क्षीरसागर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले,मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.


