Home महाराष्ट्र भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे...

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांचा सोबत विविध विषयावर बैठक संपन्न

252

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20एप्रिल):-मंगळवार 19 एप्रिलला घुग्घुस भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांच्या सोबत विविध विषयावर घुग्घुस येथील विआयपी गेस्ट हाऊस येथे बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी सीएचपी बंकरचे प्रदूषण, बहिरम बाबा देवस्थान येथील पाणी समस्या, वेकोलीच्या ठेकेदारांना कामाचा मोबदला देणे, घुग्घुस शहरात पिण्याच्या पाण्याच्या टँकर द्वारे पाणी पुरवठा करणे, टँकरद्वारे रस्त्यावर पाणी मारणे, वेकोली वसाहतीच्या रामनगर येथे स्वागत गेट लावणे, वेकोली वसाहती मध्ये लाईट लावणे, नाली सफाई करणे, पाण्याची व्यवस्था करणे, क्वार्टरची दुरुस्ती करणे, अश्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली चर्चे दरम्यान वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश वेकोलीच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, भाजपाचे रत्नेश सिंग, शाम आगदारी, हेमराज बोंमले, अमोल थेरे, श्रीकांत सावे, प्रवीण सोदारी, राजेश मोरपाका, सुशांत वाघ, अनुप जोगी, वेकोलीचे ओमप्रकाश फुलारे, संजय वैरागडे, संजय विरमलवार, पिसारोड्डी, कपूर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here