Home महाराष्ट्र बनावट लग्न लाऊन अनेकांना गंडा घालनाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक

बनावट लग्न लाऊन अनेकांना गंडा घालनाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक

264

🔹गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील एका तरूणाला बनावट लग्न करून दोन लाख रुपयांचा गंडा घातला होता

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.२०एप्रिल):-तालुक्यातील तळणेवाडी याठिकाणी राहनाऱ्या एका तरूणाला बनावट लग्न करून दोन लाख रुपयांचा गंडा घातला असल्याची तक्रार गेवराई पोलिसांत दाखल होती या प्रकरनाशी निगडीत असनाऱ्या मुख्य सुत्रधार याला शेवगाव येथून गेवराई पोलिसांनी अटक केली आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , कृष्णा अशोक फरताळे ( वय २३ वर्ष )राहनार तळणेवाडी यांनी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार गेवराई पोलिसांत दिली होती या प्रकरणी पाच आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल आहे याच प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असनाऱ्या रामकिसन जग्गनाथ तापडिया राहनार शेवगाव याला गेवराई पोलिसांनी अटक केली आहे तसेच वरील ईसम हा महाराज आहे असे अनेक बनावट लग्न त्यांने लावले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे तसेच या प्रकरणी नवरी मुलगी व तिचे नातेवाईक अद्याप फरार आहेत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. अशी माहिती गेवराई पोलिसांनी दिली असुन या प्रकरणाचा पुढील तपास पोहे सादेक सिद्धीकी करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here